Devendra Fadnavis | पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा ! शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे (PCMC Unauthorized Constructions) अधिकृत करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच योजना जाहीर करणार असल्याचे देवेंद्र फणवीस यांनी सांगितले. सध्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याची घोषणा फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पिंपरी चिंचवड महापालिकेत शास्ती कर वसूल होत नाही मूळ कर देखील वसूल होत नाही. त्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत चर्चा केली. आम्ही शास्ती कर रद्द करत आहोत. सध्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार आधीन राहून कारवाई होणार आहे. यासाठी लवकरच योजना जाहीर केली जाईल. कोर्टाच्या निर्णयानुसार आधीन राहून कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

शास्ती कर म्हणजे काय?

महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 267 अ नुसार 4 जानेवारी 2008 नंतरच्या
(Maharashtra Municipal Corporation Act) अवैध बांधकामांना देय मालमत्ता कराच्या दप्पटीइतकी
अवैध बांधकामांना दंड लावण्यात आला होता.
दरम्यान या शासन निर्णयानुसार निवासी मालमत्तांना एक हजार चौरस फुटापर्यंत दंड माफ केला होता.
एक हजार ते दोन हजार चौरस फुटापर्यंत निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या 50 टक्के दराने
दंड आकारण्यात येतो. तर दोन हजार चौरस फुटांपुढील निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट
दराने दंड आकारला जातो.

Web Title :- Devendra Fadnavis | pimpri chinchwad all unauthorized constructions in the city will be authorized devendra fadnavis announced winter session

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….

Nana Patole | खोटारडेपणा अन् चेष्टा हाच भाजपचा खरा चेहरा – नाना पटोले

MP Sanjay Raut | संजय राऊतांच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली, म्हणाले-‘संजय राऊत हा…’