Devendra Fadnavis – Raj Thackeray | मनसे-भाजपचं होणार मनोमिलन ?; नितीन गडकरींनंतर फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis – Raj Thackeray | महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय गणित बदलताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या पाडव्याच्या भाषणातून याची चाहूल दिसून आली. अशातच त्यांच्या पाडव्याच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) राज यांची भेट (Devendra Fadnavis – Raj Thackeray) घेणार आहेत.

 

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीला टार्गेट केलेलं दिसून आलं. मात्र भाजपविरोधात त्यांनी एक शब्दही काढला नाही. त्यानंतर आता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटी – गाठींनी मनसे – भाजप युतीच्या (MNS – BJP Alliance) चर्चांणा उधाण आलं आहे.

 

राज ठाकरेंच्या भेटीवर फडणवीसांनीही सावध प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे आणि माझी भेट होणं काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. आमचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. आमची भेट झाली तर आश्चर्य काय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. युतीबाबत बोलताना, भेटल्यानंतर काय बोलायचं ते आम्हाला ठरवू द्या, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

 

दरम्यान, मनसेची भूमिका महाविकास आघाडीच्या बाजूने होती तेव्हा त्यांना गुदगुल्या होत होत्या.
आता त्यांनी विरोधात भूमिका मांडली तर बी टीम आणि सी टीम असे प्रकार चालू झाले.
मग माझा सवाल आहे शिवसेना (Shivsena) ही काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीची (NCP) बी, सी कि झेड टीम आहे ?, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

 

Web Title :- Devendra Fadnavis – Raj Thackeray | devendra fadanvis will meet mns raj thackeray over mns bjp alliace discussion

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा