‘आपल्याकडे प्रथा पडलीये, ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं’, CM ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर फडणवीसांचा खोचक टोला (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – (Maratha reservation) मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये मेट्रो कारशेड (Metro carshed) यासह इतर अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. या भेटीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधानांची भेट घेतली हे चांगलं

आज मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली हे चांगलं आहे.

नाहीतर आपल्याकडे जी प्रथा पडली आहे, ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं, ती योग्य प्रथा नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

तसेच अशा चर्चांमधून महाराष्ट्राचा (Maharashtra) फायदा होईल, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारला सल्ला

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने केंद्र सरकारशी (Central Government) समन्वय (Coordination) साधला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील, तर ते चांगलंच आहे. आम्ही तर हेच नेहमी सांगत असतो.

कारण पंतप्रधान महाराष्ट्राबद्दल सकारात्मक असतात. राज्य आणि केंद्र यांनी आपापसांत संबंध चांगले ठेवले, तर राज्याचा फायदा होतो.

आपल्याकडे जी प्रथा आहे की ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं, ही प्रथा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आजचा निर्णय चांगला आहे, असे फडणवीस म्हणाले.

ही प्रिमॅच्युअर भेट

मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रिमॅच्युअर आहे.

भोसले समितीने मराठा आरक्षण पुन्हा मिळवायचं असेल, तर राज्यांनं राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करुन त्यामार्फत पुढील कारवाई करायला हवी असं सांगितलं आहे.

परंतु ती कारवाई करण्यात आली नाही. मात्र, ते भेटले ते चांगलंच आहे.

पुढे त्याचा फायदा होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Also Read This : 

 

Devendra Fadnavis | पीएम मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

 

साखर खाण्या ऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, गोड खाणं सोडल्याशिवाय मधूमेह अन् वजन वाढण्यापासून राहा दूर, जाणून घ्या

 

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पीएम मोदींना राज्यपालांचा ‘तो’ विषय सांगितला

 

Weight loss : वजन कमी करण्यासाठी ‘जीम’ला जाऊ शकत नसाल तर OK; घरातील कामे करून देखील बर्न होतात कॅलरी, जाणून घ्या

 

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील हळंदे टोळीवरमोक्का