…म्हणून ED नं सरनाईकांच्या घरावर धाड टाकली असावी : देवेंद्र फडणवीस

पोलिसनामा ऑनलाइन – ‘कुणीतरी तक्रार केल्याशिवाय किंवा काहीतरी मटेरियल असल्याशिवाय ईडी कोणावरही धाड टाकत नाही. ईडीकडे नक्कीच काहीतरी पुरावे असतील,’ असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं सोलापूरमध्ये आले असता पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सरनाईक यांच्या घरावर ईडीनं टाकलेल्या छाप्याबाबत त्यांना विचारण्यात आले. तेव्हा फडणवीस म्हणाले, एखाद्यानं चूक केली नसेल तर त्याला ईडीच्या छाप्याला घाबरण्यांचं काही कारण नाही. चूक झाली असेल तर कारवाई होईलच. या संपूर्ण घडामोडींची माहिती माझ्याकडं नाही. त्यामुळं मी त्यावर फारसं काही बोलणार नाही. मात्र, माझ्या माहितीनुसार, ईडी कुणावरही पुराव्याशिवाय छापा टाकत नाही. त्यांनी तशी कारवाई केली असेल तर नक्कीच त्यांच्याकडे काही तक्रारी किंवा मटेरियल असेल.

दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावरील कारवाईचं जोरदार स्वागत करत उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला. ते म्हणाले, ‘प्रताप सरनाईक यांच्याबद्दल मी असं अनेकदा ऐकलं होतं. त्यांचे मुखिया (उद्धव ठाकरे) देखील असेच उद्योग करतात. ‘

You might also like