देवेंद्र फडणवीसांकडून आरोपांचे ‘खंडन’, म्हणाले – ‘विरोधकांचे फोन ‘टॅप’ करणं महाराष्ट्राची संस्कृती नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन भाजप सरकारकडून राजकीय विरोधकांचे फोन टॅब करण्यात आल्याचा आरोप होत असताना आता माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे खंडन केले आहे. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस फोन टॅप प्रकरणाबद्दल आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी एक स्टेटमेट जारी केले आहे. त्यात ते म्हणाले की राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि तेव्हा राज्य सरकारने तसे कोणतेही आदेश दिले नव्हते.

ज्यांच्याकडून असे आरोप होत आहेत त्यांची राजकारणातील विश्वासर्हता काय आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे असा टोला फडणवीसांनी आरोप करण्याऱ्यांना लगावला आहे. तेव्हा शिवसेनेचे नेते देखील गृहराज्यमंत्री होते. या प्रकरणासंबंधित पूर्ण चौकशी करुन त्या संबंधित अहवाल सादर करावा. गरज पडली तर इस्त्राइलला जाऊन चौकशी करावी असा सल्ला देखील फडणवीसांनी दिला आहे.

ठाकरे सरकारने ‘भाजप’ला आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. भाजप सरकार असताना विरोधी पक्षांचे ‘फोन-टॅप’ केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी अशा प्रकारचा आरोप केला होता त्यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने आता या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्रालयाने हे आदेश देण्यामागचे कारण सांगितले जात आहे की भाजपची सत्ता असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांचे फोन टॅप केले गेले होते असा आरोप करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –