Devendra Fadnavis । ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ओबीसीं राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या विषयावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांस आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर ओबीसीं आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्यावरून भाजप आणि भाजप (BJP) नेते आक्रमक झाले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. devendra fadnavis said if you do not have strength tell us will give obc political reservation in four months

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आज (24 जून) रोजी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रदेश कार्यसमिती बैठक पार पडली. यावेळी ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) पुर्ववत आणण्याच्या मागणीवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठलं तर केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, आम्ही जर चार महिन्यात. हो आमचं राज्य असतं, तर आम्ही चार महिन्यात ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार करुन जर ओबीसींचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर पदावर देखील राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, भाजप 26 तारखेचं आंदोलन करुन शांत बसणार नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) जोपर्यंत परत येणार नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही. आता हा संघर्ष अटळ आहे. तुम्हाला नसेल जमत तर मदत मागा आम्ही मदत करायला तयार आहोत. ओबीसींसाठी संघर्ष करु. पण जर ओबीसींना फसवाल तर भाजप शांत बसणार नाही. असं फडणवीस म्हणाले.

या दरम्यान पुढे ते म्हणाले, ‘इच्छा असावी लागते, या ठिकाणी इच्छाच नाहीये.
ज्यावेळी उच्च न्यायालयात (High Court) विषय मांडायला हवा होता त्यावेळी न्यायालयात तारखा घेत होते आणि मंत्री रस्त्यावर मोर्चे काढत होते.
आजही पाहा इम्पेरिकल डेटा (Imperial data) तयार करत नाहीयेत तर त्याऐवजी यांचेच कार्यक्रम.
मोर्चे सुरू आहेत असं देखील फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

Web Title :- devendra fadnavis said if you do not have strength tell us will give obc political reservation in four months

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव