देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘मुख्यमंत्री नवीन अन् प्रशासकीय अनुभव नसलेले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमित रुग्ण सर्वाधिक असून देशात महाराष्ट्र अव्वल आहे. एकट्या महाराष्ट्रात 40 हजार प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तर 1400 लोकांनी आपला जीव गमावला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. अशा स्थितीत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. मुंबईतली परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेली असं चित्र दिसतं आहे. पहिल्या लॉकडाऊन पासूनच धोरणात्मक निर्णय घेण्यास हे सरकार अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवीन आहेत आणि त्यांना कोणताही प्रशासकीय अनुभव नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले, चीनमधून जाणाऱ्या उद्योगांना आकर्षित करम्याची महाराष्ट्राला चांगली संधी आहे. परंतु यासाठी राज्या सरकारला अ‍ॅक्टिव्हिटी दाखवावी लागेल. ते म्हणाले करोना विरोधात लढताना राज्य सरकाराला निर्णय घेताना अवघड जात आहे.

महाराष्ट्र सरकारमधील मत्र्याचे केंद्रावर आरोप
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत झालेला असताना केंद्र सरकारकडून मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या आठवड्यात केंद्राने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकजमध्येही राज्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले असून आणि महाराष्ट्राला केंद्राकडून सतत सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केला आहे. कोरोनाच्या निमित्ताने मुंबईतील सर्व महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळवण्याचा केंद्राचा कुटिल डाव असून तो आम्ही हाणून पाडू, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.