BMC वर 2022 मध्ये भगवा झेंडा फडकणार परंतु भाजपाचा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : 2022 मध्ये होणार्‍या बीएमसी निवडणुकीसाठी भाजपाने आपली कंबर कसली आहे. माजी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपाच्या कार्यकारिणीला संबोधित करताना विश्वास व्यक्त केला की, 2022 मध्ये बीएमसीवर भगवा झेंडा फडकणार परंतु तो भाजपाचा असेल.

फडणवीस यांनी सीएम उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाव न घेता निशाणा साधताना म्हटले की, राजाचा जीव जसा पोपटात असतो, तसा काही लोकांचा जीव बीएमसीमध्ये आहे. प्रत्येक वार्डात एका नेत्याची नियुक्ती केली जाईल, युवा मोर्चाने प्रत्येक बूथवर 50 आणि महिला मोर्चाने 100 लोकांना जोडावे, याच धोरणासोबत काम करू आणि मागच्या वेळची कसर यावेळी भरून काढू.

कोरोना काळात स्थिती सांभाळण्यात सरकार फेल
कोरोना काळात ज्याप्रकारे ठाकरे सरकारने स्थिती सांभाळली आहे, त्यावर फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. फडणवीस यांनी सरकारला विचारले आहे की, देशात कोरानामुळे जे मृत्यू झाले त्याच्या 40% मृत्यू महाराष्ट्रात झाले. यास जबाबदार कोण? मुंबईत ज्या 10 हजार लोकांचा जीव गेला, त्यावर सरकार कधी उत्तर देणार? सरकारमध्ये बसलेले लोक कोरोनावर सध्या आपली पाठ थोपटून घेण्यात मग्न आहेत, परंतु सत्य हे आहे की, कोरोना काळात काम कमी आणि टेंडरवर जास्त फोकस होता. भाजपा लवकरच याचा भांडाफोड करेल.

विकासविरोधी सरकार आहे
देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार हल्ला केला. त्यांनी म्हटले की, महापालिकेत सत्तेत बसलेल्या पक्षाने किती अनधिकृत कामे केलीत? किती नद्या बुझवल्या? मेट्रोच्या कामाचा का विरोध केला? बुलेट ट्रेनचा विरोध करून सरकारने महाराष्ट्राचे 50 हजार कोटींचे नुकसान का केले? जर याचा विरोध झाला नसता तर सीमेंट, लोखंडसारख्या वस्तू स्थानिक व्यापार्‍यांकडून घेतल्या गेल्या असत्या, ज्याचा फ़ायदा राज्याला झाला असता.

फडणवीस यांनी सरकारवर आरोप करताना म्हटले, मुंबईचे जर आणखी एक एयरपोर्ट असते तर मुंबईचा जीडीपी 1 % ने वाढला असता. परंतु असे झाले नाही. 2017 मध्ये भाजपा शिवसेनेच्या अवघी 2 जागांनी मागे होती. भाजपाने 82 आणि शिवसेनेने 84 जागांवर विजय मिळवून सत्ता बनवली. भाजपाला आशा आहे की, यावेळी शिवसेनेचा नाकर्तेपणा उघड करत मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवू.