Devendra Fadnavis | ‘अंदाज कुछ अलग है मेरा, किसको…’, फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे? (व्हिडिओ)

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Highway) शिर्डी ते भरवीर या 80 किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकर्पण शुक्रवारी (दि.26) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित पार पडला. शीर्डीजवळील कोकमठाण येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेरो-शायरी केलीच, शिवाय शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, येत्या सहा महिन्यांमध्ये हा महामार्ग पूर्ण होईल. शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते तेव्हा आम्ही हे स्वप्न पाहिलं होतं. मागास भागाचा विकास करण्यासाठी ही महामार्ग आहे. अनेकांना हे स्वप्न वाटायचं. मला विश्वास होता, रेकॉर्ड टाईममध्ये हे काम पूर्ण होईल. ‘अंदाज कुछ अलग है मेरा, किसको मंजिल पाने का शौक है, मुझे रस्ता बनाने का’, असा शेर फडणवीस यांनी केला. त्यामुळे त्यांच्या शायरीचा रोख नेमका कोणाकडे होता? अशी चर्चा सुरु झाली आहे.
ज्या गावात जाऊन विरोध केला, तेथील लोकांनी…
समृद्धी महामार्गासाठी जागा हस्तांतित करण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेत कायदा केला. न भुतो असा दर जागेसाठी दिला. पण, अनेक लोकांनी याला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरला जाऊन सभा घेतली. हा महामार्ग होऊ देणार नाही, असं सांगितलं. शरद पवार यांनी नगर जिल्ह्यात बैठक घेत, हे शक्य नसल्याचे म्हटलं. मात्र, ज्या गावात जाऊन विरोध केला, तेथील लोकांनी स्वत:हून जमीन देण्यास तयार असल्याचं पत्र दिलं. ही जमीन नऊ महिन्यांमध्ये एक्वायर केली, असं फडणवीसांनी सांगितलं.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1662061201629802498?s=20
गोंदियापर्यंत विकास होणार
राज्यातील पंधरा जिल्ह्यांचं भाग्य समृद्धी महामार्ग बदलणार आहे. आधी मुंबई आणि पुण्याचा विकास व्हायचा.
पण आता गोंदियापर्यंत विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगधंदे, कृषी समृद्धी या सर्व गोष्टी महामार्गामुळे तयार
करु शकणार आहोत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1662059333465800704?s=20
महामार्ग वेगवान असला तरी…
समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) लवकर बसवण्यात यावी, अशी विनंती करतो.
महामार्गावर 120 ची किमी वेग मर्यादा असली, तरी सर्व गाड्या या वेगात चालण्यायोग्य नाहीत.
त्यामुळे अशा गाड्या घेऊन वेगाने जाऊ तर अपघात होऊ शकतो. महामार्ग जरी वेगवान असला,
तरी आपलं जीवन त्यापेक्षा मौल्यवान आहे. म्हणून लोकांनी देखील काळजी घेतली पाहिजे,
असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
Web Title : Devendra Fadnavis | samruddhi highway second phase inauguration by cm eknath shinde dcm devendra fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा