मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘नुकसान’ग्रस्त शेतकर्‍यांसाठी उघडला ‘खजाना’, 5380 कोटींचा निधी ‘मंजूर’

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन – राज्यामध्ये परतीच्या पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यापूर्वी मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. मात्र, हा निधी अपुरा असून यामध्ये आणखी मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, रविवारी रात्री उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीदरम्यान नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपातकालीन निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 5,380 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सीएमओच्या ट्विटर अकाऊंटवरून मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

रविवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली होती. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. राज्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना जाहीर करण्यात आलेली मदत पुरेसी नाही. त्यामुळे अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना द्यावी या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली.

Visit : Policenama.com