Devendra Fadnavis | पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा पुन्हा गौप्यस्फोट; म्हणाले, – “पवारांबरोबरच्या बैठकीतच…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतरच्या अभुतपूर्व सत्तासंघर्षादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक पहाटेच्या वेळी राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. याच पहाटेच्या शपथविधीवर फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. “शरद पवारांचे गुपीत समजून घ्यायचे असेल तर त्यांचा इतिहास समजून घ्यायला हवा. हा इतिहास समजला तरच गुपीत उघड करता येईल. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) युती तोडून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (NCP) बोलणी सुरु केली. त्यानंतर त्यांनी (उद्धव ठाकरेंनी) आमचा फोनही घेणे बंद केले. त्यावरुनच ते आमच्याबरोबर येणार नाहीत हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्हीही पर्याय शोधण्यास सुरुवात केली. आमच्याकडे कोणते पर्याय आहेत, याचा आम्ही विचार करत असताना राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितले की, एनसीपी भाजपाबरोबर (BJP) येऊ शकते आणि राज्यात स्थिर सरकार देऊ शकते, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, की आमची शरद पवारांबरोबर बैठक झाली. त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याचे ठरले. सरकार कसे असेल, याचा आराखडा एकत्रितपणे तयार करण्यात आला. या सरकारचे नेतृत्व अजित पवार आणि मी दोघे करणार असेही ठरले. सर्व अधिकार आम्हाला देण्यात आले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारीही केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी यामधून माघार घेतली,” असा खुलासा फडणवीसांनी केला.

दरम्यान, “आमचा शपथविधी व्हायच्या तीन-चार दिवस आधी शरद पवारांनी यामधून माघार घेतली. आम्ही (अजित पवार आणि मी) पूर्ण तयारी केली होती. त्यामुळे अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय इतर पर्याय उरला नाही. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. आपण इतक्या बैठका घेतल्या असल्याने बाकीच्या (राष्ट्रवादीच्या) आमदारांसहीत शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण तसे घडले नाही आणि शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचे सरकार पडले. मात्र मी हे ठामपणे सांगेन की, त्यावेळी जो सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, त्याची सुरुवात पवारांशी बोलूनच करण्यात आली होती, असा दावाही फडणवीसांनी केला.

Web Title :  Devendra Fadnavis | sharad pawar agreed to form govt then backed off devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा