Devendra Fadnavis | पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांसोबत चर्चा झाली होती! देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं धक्कातंत्र संपूर्ण राज्याला पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हे सरकार केवळ 72 तासात कोसळलं आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) आले. पहाटेच्या शपथविधीबाबत (Swearing in) अजित पवार यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. तो शपथविधी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) चर्चा करुनच झाला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आमच्याकडे राष्ट्रवादीकडून (NCP) ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट (Stable Government) हवंय, म्हणून आपण सरकार तयार करुया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, त्यावेळी त्याचा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे त्याठिकाणीही आमच्या सोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता, हा लहान होता, असं फडणवीस यांनी सांगितलं.

 

… तर मी सांगीन
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीची नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. मात्र, त्यानंतर ते कशा प्रकारे तोंडघशी पडले हे अजित पवारच सांगतील. त्यांनी जर सांगितले नाही, तर मी सांगीन, असंही फडणवीस यांनी म्हटले.

त्यामुळे आम्हाला संधी मिळाली
तुम्ही पहाटेच्या शपथविधीवर सकाळ, पहाटे किंवा अर्ध्या रात्रीचं म्हणा. काय फरक पडतो? भूतकाळ हा भूतकाळ असतो.
पण त्यानंतर या दोघांनी आमच्यासोबत जी वागणूक केली होती, त्यामुळे आम्हाला संधी मिळाली.
त्यांच्या पक्षात कुरबुरी झाल्या. त्यांचे लोक बाहेर पडले.

 

मला जे दिलं ते व्याजासहीत परत केलं
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांवर हे सरकार चालत नाही.
आम्हाला गुदमरतंय, असं त्यांना वाटत होतं. तीच संधी आम्ही घेतली. आम्ही त्यांना सोबत घेतलं.
आम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. मी तर असं म्हणतो एकदम नैसर्गिक सरकार आहे.
कारण या सरकारमधील जे लोक आहेत त्यांनी एकमेकांसाठी मते मागितली होती.
त्यामुळे मी बदला हा शब्द वापरला होता. तुम्ही मला जे दिलं ते व्याजासहीत परत केलं.

 

Web Title :- Devendra Fadnavis | sharad pawar knew about bjp and ncp forming government in 2019 says deputy chief minister devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची 4 थी कारवाई

Vasai Crime News | ‘मरने दे साले को’ म्हणत कारचालकाने वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेलं

Pune Crime News | सेक्‍सटॉर्शन प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर