Devendra Fadnavis | शिवसेनेला ‘जनाब सेना’ म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ फोटो सोशलवर तुफान व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप (BJP) शिवसेनेला (Shivsena) टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही. MIM चे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळात भाजपचे नेते सेनेला ‘जनाब सेना’, ‘दाऊद सरकार’ अशा विशेषणांनी हिंणवत आहेत. शिवसेनेकडूनही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवसेना आमदार मनीषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक जुना फोटो ट्विट करुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

 

मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री (CM) असतानाच्या काळात ते उपस्थित राहिलेल्या एका कार्यक्रमाचे फोटो ट्विट केले आहेत. देवेंद्र फडणवीस बोहरी मुस्लीम समुदायाच्या (Bohri Muslim Community) एका कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा कार्यक्रमपत्रिकेवर देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या नावापुढे जनाब असे संबोधन लावल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत देवेंद्र फडणवीस मजारीपुढे नतमस्तक झालेले दिसत आहे. त्यावेळी त्यांनी मुस्लिम धर्मीयांची टोपीही परिधान केली होती. हाच धागा पकडत कायंदे यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

मनिषा कायंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जनाब देवेंद्र फडणवीसजी, तेंव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवतांना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का ? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग ? अरे हो, 105 आमदार निवडूनही भाजप सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का ? अशा शब्दात कायंदे यांनी फडणवीसांना जुन्या घटनेची आठवण करुन देत प्रश्न विचारले आहेत.

 

आम्ही ‘जनाब सेना’ मग भाजपला ‘हिजबूल सेना’ म्हणायचे का ?

भाजपकडून हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरुन केल्या जाणाऱ्या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) यांनीही प्रत्युत्तर दिले होते.
मुसलमानांविषयी भाजपने काही केलं तर ते देशप्रेम, आम्ही काही केलं तर तो देशद्रोह ठरतो.
मग मेहबुबा मुफ्तीसोबत (Mehbooba Mufti) युती (Alliance) करणारे आणि अजहर मसूद (Azhar Masood) सोडणाऱ्या भाजपला हिजबुल जनता पक्ष म्हणायचे का ? एवढे घाणेरडे आरोप आम्ही केले नव्हते. आमच्यावर ती वेळ येऊ देऊ नका. पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होतं ? हा काळा इतिहास पाहून आम्ही अजूनही त्यांना भाजपच म्हणतोय, पाजपा म्हणजे पाकिस्तान जनता पक्ष म्हणत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

 

Web Title :- Devendra Fadnavis | shivsena leader manisha kaynde tweet devendra fadnavis photo visting majar dawoodi bohra community in mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा