आमदार बच्चू कडूंनी सुचवली भन्नाट ‘आयडिया’, भाजपासह शिवसेनेचं होणार ‘स्वप्न’ पूर्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना-भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही सरकार स्थापन झालेलं नाही. सत्तावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये कमालीची चढाओढ लागली आहे. भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. तर शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि मुख्यमंत्री व्हावे असे सुचवलं आहे.

राज्यात ओला दुष्काळ असून शेतकऱ्यांना मोठी मदत जाहीर करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. देशात भाजप मोठा पक्ष आहे आणि सेना-भाजपचं 25 वर्षांच नातं आहे. मोठा भाऊ म्हणून भाजपने पुढे येऊन काही पावलं टाकत असल्यास राज्यासाठी ते अधिक चांगलं होईल. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल. आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, आम्ही दिलेल्या शब्दावर कायम राहणार असल्याचे कडू यांनी सांगितले. आमच्या संघटनेच्या दोन्ही आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याने आम्ही शिवसेनेला प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात जे बोलणं झालं आहे, जो शब्द दिलाय तो पाळला पाहिजे असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला.

दुसरीकडे आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार यावर ते ठाम आहेत. आम्हाला अधिक काही नको, जे ठरले आहे तेच आम्ही मागत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आम्ही चर्चेला तयार आहोत मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करावा त्यानंतर पुढील चर्चा करता येईल अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके