Mansukh Hiren case : फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल; म्हणाले – ‘राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडीचा तपास चालू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू त्या गाडीमध्ये आढळून आला. या घटनेवरून राज्य सरकारवर विधिमंडळ अधिवेशनात मोठी टीका होत आहे. यावरून आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

या प्रकरणावरून फडणवीस म्हणाले, राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे. मनसुख हिरेन यांचा जीव जाऊ शकतो हे मी आधीपासून सांगत होतो. ते सगळयात महत्त्वाचे साक्षीदार होते. दुर्दैवाने त्यांचा जीव गेला. आता एटीएसने त्यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मी सांगत होतो, तेच एटीएसच्या तपासात पुढे यायला लागलं आहे. अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पण त्यांच्याकडील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही. मृत्यू कुणाला चुकला आहे? त्यात अनैसर्गिक मृत्यू आप्तेष्टांना हलवून जातो. मनात संशय निर्माण करतात आणि राजकारणी त्यात भर घालतात. मनसुख मृत्यू प्रकरणी तपास सुरू असताना विरोधीपक्ष तेच करीत आहेत. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे, सामना अग्रलेखातुन मांडण्यात आले आहे. तसेच एटीएसने या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपास सुरू आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली आहे.