Devendra Fadnavis । बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) वेगवेगळ्या मुद्यावरून जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांनी राज्य सरकारच्या (State Government) दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाचा निषेध करत हल्लाबोल केला आहे. ‘बारमध्ये गर्दी झालेली चालते, पक्ष कार्यालयाच्या उदघाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको?’, असा रोखठोक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. devendra fadnavis slams state government over two days maharashtra legislative assembly session

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राज्याच्या अधिवेशनाचे दिवस जवळ आले की महाराष्ट्रात कोरोना वाढतो असे आमच्या लक्षात आलं आहे. राज्यासमोर इतके गंभीर प्रश्न निर्माण झालेले असताना हे सरकार केवळ दोन दिवसांचं अधिवेशन जाहीर करुन राज्यातील जनतेचा अपमान करत आहे. लोकशाही बासनात गुंडाळायची कार्यपद्धती या सरकारनं सुरू केलीय असा संताप व्यक्त करत फडणवीस यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Gold Price Today | सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीत किंचित घसरण; जाणून घ्या

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रश्न तर सोडाच मात्र,
विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडणुकीचा कार्यक्रम देखील हे सरकार अजून देखील मार्गी लावू शकलेलं नाही.
आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवर काहीच ठाम भूमिका घेतलेली नाही.
राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठीचं पत्र केव्हाच सरकारला दिलं आहे.
मात्र, राज्य घटनेचे सर्व नियम पायदळी तुडवून राज्याचे मंत्री मस्तवाल झालेत,
हे प्रशासन अर्निंबध झालं आहे, मग यांना आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का?,
असा संतप्त सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : devendra fadnavis slams state government over two days maharashtra legislative assembly session

हे देखील वाचा

माजी मंत्री विजय शिवतारे हॉस्पिटलमध्ये, मुलीनं लिहिली भावांबद्दल धक्कादायक Facebook पोस्ट

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

Pune Rural Police | पोलिसाची हाताची नस कापून घेतल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या, मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली