Devendra Fadnavis | हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्यांवर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Devendra Fadnavis | राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळले आहे, कायदा आणि सुव्यवस्था अनेक ठिकाणी धोक्यात आली आहे. काल आंदोलकांनी राजकीय नेत्यांच्या घरांना, संस्थांना आणि वाहनांना लक्ष्य केले. आंदोलनाने हिंसक वळण मिळाल्याने याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे. आम्ही मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहोत मात्र हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला की, काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीसांनी म्हटले की, आपल्याला कल्पना आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन चालले आहे त्यासंदर्भात राज्य सरकार (State Govt) सकारात्मकतेने पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) तसे वचन दिले आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, बीडमध्ये सोमवारी लोकप्रतिनिधींची घरे जाळणे, विशिष्ट लोकांना टार्गेट करणे, प्रतिष्ठाने जाळणे, दवाखाने जाळणे ही कृती काही लोकांनी केली. ही कृती चुकीची आहे. त्यावर कारवाई होणार आहे. जिथे शांततापूर्ण आंदोलन सुरु आहे तिथे कुठलीही कारवाई केली जाणार नाही. मात्र हिंसेला कुठेही थारा देणार नाही. या संदर्भात आवश्यकतेप्रमाणे अतरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करतील.

फडणवीसांनी आरोप केला की, काही राजकीय पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते देखील या हिंसाचारात सहभागी झाल्याचे
दिसत आहे. त्यासंदर्भातले सर्व पुरावे मिळाल्यानंतर त्याचीही माहिती दिली जाईल.
काही लोक जाणीवपूर्वक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर आम्ही कारवाई करणार आहोत.
काही लोक फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देत आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे.

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांबाबत सांगताना फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे
त्यांच्यासाठी काही निर्णय आज मंत्रिमंडळात घेण्यात आले. दोन हेक्टरचा निकष, तीन हेक्टरपर्यंत वाढवण्याचा
निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे त्यांनाही मदत दिली जाणार आहे.
ज्या शेतकऱ्याच्या जमिनीचा भाग खरडून गेला आहे आणि पिकाचे नुकसान झाले आहे त्याला दोनदा मदत केली जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त, मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने खबरदारी

Maratha Reservation | मराठा आंदोलनाचे चटके जाणवू लागताच, मंत्रालयाबाहेर ३ आमदार बसले उपोषणाला; आरक्षणाची केली मागणी