Devendra Fadnavis | ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही’; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर (Mumbai Somaiya Ground) भाजपच्या (BJP) बुस्टर डोस (Booster Dose) सभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लक्ष केले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  म्हणाले, मशीदीवरील भोंगे (Azaan Loudspeakers) काढायला सांगितले तर ते झालं नाही आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली. हिंदू कधी मशीद पाडूच शकत नाही. तो ढाचा होता ते पाडण्याचं काम आम्ही अभिमानानं केलं. तो ढाचा पाडताना देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होता. याच राम मंदिरासाठी (Ram Temple) सेंट्रल जेलमध्ये मी 18 दिवस घालवले आणि तुम्ही आम्हाला विचारता. बाबरी पडली तुम्ही कुठे होता? असा सवाल त्यांनी शिवसेनेला (Shivsena) केला आहे.

 

तुम्ही म्हणजे हिंदू नाही….
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, काही लोकंचा, काही लोकांचा गैर समज आहे की, ते म्हणजे महाराष्ट्र (Maharashtra) आहे. त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान. मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो, लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जातीच्या 12 कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केला आहे. तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा सन्मान. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे, हिंदू नाही… पण मी हे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही.

आता महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हटलं तर राजद्रोह
फडणवीस पुढे म्हणाले, आता महाराष्ट्रात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हटलं तर राजद्रोह होतो. माझा तुम्हाला सवाल आहे की तुम्ही रामाच्या की रावणाच्या बाजूचे आहात. याचा निकाल तुम्ही लावा. काश्मीरमध्ये (Kashmir) म्हणतात तुम्ही मेहबुबा मुफ्तींसोबत (Mehbooba Mufti) गेले. हो आम्ही गेलो कारण तेव्हा गरज होती. पाकिस्ताननं (Pakistan) म्हटलं होतं की तिथं निवडणुका होऊ देणार नाही. पण आम्ही सरकार स्थापन करुन दाखवलं. जेव्हा आमचं काम झालं तेव्हा त्याच मुफ्तींचं सरकार खाली खेचण्याचं काम आम्ही केलं.

 

 Web Title :- Devendra Fadnavis | some people think that this is maharashtra fadnavis attacks uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Buttermilk | उन्हाळ्यात ताकाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं, पण ‘या’ लोकांसाठी अडचणी वाढू शकतात; जाणून घ्या

 

Pune Crime | महिना 10 ते 15 टक्के व्याजाने पैसे देऊन 3 लाख रुपये खंडणीची मागणी; खासगी सावकार अमोल गायकवाड याच्यावर FIR

 

Lower Cholesterol Level | कोलेस्ट्रॉल वाढीच्या समस्येत ‘या’ 4 गोष्टी ठरू शकतात फायदेशीर