Devendra Fadnavis । ‘ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, निवडणुका रद्द केल्या नाहीत तर… – फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात राजकीय वातावरण उफाळलं आहे. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी अनेक मंत्री नेते आक्रमक झाले असतानाच मंगळवारी (22 जून) रोजी राज्य निवडणूक आयोगाने नागपूरसह 5 जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केलीय. मात्र, या निवडणुकीत ओबीसींसाठी आरक्षण राहणार नाही.

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर

यावरून आता भाजप आक्रमक झाला आहे. ‘या निवडणुका रद्द केल्या नाहीत तर भाजपा उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणतात..

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकतर राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले. मंत्री म्हणतात, हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोवर निवडणुका होणार नाहीत आणि दुसर्‍याच दिवशी निवडणुका जाहीर होतात. ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा. अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात ओबीसींचं राजकीय आरक्षण हे संपल्यानंतर, वारंवार सरकारने आश्वस्त केलं, की आम्ही या संदर्भातील कारवाई करू. ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं की जोपर्यंत ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही,

फेसबुक ला लाईक करा

तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी या निवडणुका घोषित होतात. हा एक प्रकारचा ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे. ओबीसींचं राजकीय आयुष्य संपवण्याचा घाट सरकारच्यावतीने घातला जातोय, हे आम्ही सहन करणार नाही. असे ते म्हणाले.

‘जुमलेबाज मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत; पुण्यासह शंभर शहरांची झाली पिछेहाट’ – माजी आमदार मोहन जोशी

कुठल्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करून, या निवडणुका रद्द केल्या पाहिजेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
तसेच, या निवडणुका जर पुढे ढकलल्या नाहीत, रद्द केल्या नाहीत तर उग्र आंदोलन भाजपा करेल,
असा इशारा मी राज्य सरकारला या ठिकाणी देतोय,

stop betraying the obc community otherwise fadnavis warns thackeray government

कुठल्याही परिस्थिती ओबीसींचा विश्वासघात बंद करा, अशाप्रकारचं राज्य सरकारला आमचं आव्हान आहे.
अशा शब्दात फडणवीस यांनी एक इशारा दिला आहे.

Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले…

या दरम्यान, ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या, यासाठी महाविकास आघाडीतील विजय वडेट्टीवार व छगन भुजबळ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आग्रही असतानाच काल (मंगळवारी) राज्य निवडणूक आयोगाने धुळे,

Social Activist Anjali Damania । ‘फक्त अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी ईडीकडून अविनाश भोसले यांच्यावर कारवाई?’

नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली.
विशेष म्हणजे, ओबीसींच्या वाट्याच्या जागा खुल्या वर्गातून भरल्या जाणार असल्याने ओबीसी नेत्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Devendra Fadnavis | stop betraying the obc community otherwise fadnavis warns thackeray government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update