देवेंद्र फडणवीसांनी घेतली ‘शपथ’ अन् ‘त्यांनी’ केली टेम्पोची ‘ऑर्डर’ रद्द !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेले महिनाभर राज्यात कोणतेही सरकार स्थापन होत नव्हते. आता तर शिवसेनेचे सरकार स्थापन होऊ लागले आहे. त्यामुळे आता त्यात आपल्याला काही स्थान मिळण्याची शक्यता नाही, असे समजून त्यांनी आपले मुंबईतील चंबु गबाळे आवरण्याचे ठरविले होते.

तशी टेम्पोवाल्याला सामान हलविण्यासाठी ऑर्डरही दिली होती. शनिवारी तो येणार होता. पण सकाळीच उठल्यावर त्यांनी टीव्ही लावला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याचे दाखविण्यात येत होते. त्यांनी तातडीने वर्षावर फोन केला व आपण तर बंगला सोडत होतो. तेव्हा त्यांना टेम्पोची ऑर्डर रद्द करा आणि वर्षावर या असे निमंत्रण देण्यात आले.

ही कहाणी आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राहिलेले व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची. महादेव जानकर हे अविवाहित आहेत. त्यांच्या बंगल्यात फार काही सामान नव्हते. सरकार स्थापन होत नसल्याने त्यांनी बंगला खाली करण्याचे ठरविले होते. त्यांचे सामान हे एका टेम्पोमध्ये बसेल इतकेच असल्याने त्यांनी एका टेम्पोला ऑर्डर दिली होती.

त्याप्रमाणे टेम्पो शनिवारी सकाळी येणार होता. पण, शनिवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. जानकर यांना हे समजले तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे शपथ घेऊन पुन्हा वर्षावर परतलेही होते.

जानकरांनी त्यांना आपण बंगला सोडण्याचा निर्णय घेऊन सामान हलविण्यासाठी टेम्पोही मागविला असल्याचे फडणवीस यांना सांगितले. तेव्हा त्यांनी जानकर यांना टेम्पोची ऑर्डर कॅन्सल करा आणि इकडे या, असे सांगितले. त्यानुसार जानकरांनी टेम्पोची ऑर्डर रद्द करुन बुके घेऊन ते वर्षावर पोहचले.

Visit : Policenama.com