Devendra Fadnavis | …पण बऱ्याचदा अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकलीये’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते (BJP) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा जुलै महिन्यात एकाच दिवशी वाढदिवस (Birthday) झाला. राजकारणातील एकमेकांचे विरोधक असलेल्या दोघांचाही जन्मदिन एकाच दिवशी आहे. यांनतर जुलै महिन्यातच मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (chief minister uddhav thackeray) यांचा देखील वाढदिवस झाला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना काही सवाल करण्यात आला. जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का? या सवालावर फडणवीसांनी आपल्या खास शैलीत अजित पवारांना टोला लगावला आहे.

एका मुलाखती दरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारलंत तर त्यांना जास्त आनंद होईल. कारण त्यांचाही जुलैचा वाढदिवस आहे. पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकलीये, पण आता त्याबद्दल काय सांगायचं? असं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत अजित पवारांना (Ajit Pawar) चिमटा काढला आहे. दरम्यान, त्यांनतर पवार आणि फडणवीस यांच्या वाढदिवशी दोघांनीही एकमेकांविषयी वृत्तपत्रात लेख लिहिला होता. यावरून तुमचं आणि अजित पवार यांचं नातं कसं आहे? असं फडणवीसांना विचारण्यात आलं.

या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘प्रश्न नात्याचा नाही. एका वृत्तपत्राने आम्हाला दोघांना
एकमेकांविषयीचा लेख मागितला. आता इतकी वर्षे अजित पवार (Ajit Pawar) राज्याच्या
राजकारणात आहेत. म्हणून त्यांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे. वेगवेगळ्या पदांवर
त्यांनी काम केलंय. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टींबद्दल आमचं दुमत असेल, काही गोष्टींबद्दल विरोध असेल. परंतु, त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान मान्य करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि म्हणून मी लेख लिहिला. त्यांनी देखील माझ्या कार्याविषयी त्यांना जे वाटतं त्याबद्दल लेख लिहिला आहे. त्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज नसल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा

Pune News | हवेली सह दुय्यम निबंधकांची वरिष्ठांकडून ‘पोलखोल’, तडकाफडकी निलंबित

Suspected Death of Judge | हत्या की दुर्घटना ! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या न्यायाधीशांचा ऑटोच्या धडकेने मृत्यू, मंत्र्याच्या आदेशानंतर तपासासाठी विशेष पथक (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Devendra Fadnavis talked about ajit pawar having same birthday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update