Devendra Fadnavis | ‘संपूर्ण ठाकरे गटच तीन ते चार लोकांमुळे असंतुष्ट, भविष्यात…’, देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सामनाच्या अग्रलेखात शिंदे गटाचा (Shinde Group) उल्लेख भाजपाने (BJP) खुराड्यात पाळलेल्या कोंबड्या आणि 13 तुर्रेबाज कोंबडे असा खासदारांचा (MP) उल्लेख केला आहे. तसेच मिंधे गटात 22 आमदार आणि 9 खासदार अस्वस्थ आहेत असे म्हटले आहे. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाविषयी (Thackeray Group) सूचक विधान केलं आहे. संपूर्ण ठाकरे गटच तीन ते चार लोकांमुळे असंतुष्ट आहे, भविष्यात तुम्हाला समजेल, असे विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे.
तीन-चार लोकांमुळे तिथे एवढी अस्वस्थता आहे त्याच ठाकरे गटाच्या संदर्भात मी बोलण्यापेक्षा तुम्हाला
भविष्यात कळेल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
कोर्टाच्या निर्णयाबद्दल विचारलं असता फडणवीस म्हणाले, शिवसेना (Shivsena) किंवा एनसीपी (NCP) असेल त्यांना माहिती आहे की पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह रहावा, त्यांना असं वाटू नये की आता सगळच संपलंय, म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य ते करत असतात. पण अशा वक्तव्यांनी कुठल्याही न्यायालयाचा निर्णय बदल नसतो.
19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन (Shiv Sena Vardhapan Din) आहे.
यंदा मात्र शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत.
शिवसेना आणि ठाकरे गट आपापले सोहळे करणार आहेत.
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे.
त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल. त्याबद्दल काय बोलणार? 19 जून रोजी ठाकरे गटाने वेगळा वर्धापन दिन सजारा
करणार आहे तर शिंदे गट वेगळा, यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नला फडणवीस यांनी उत्तर दिलं.
Web Title : Devendra Fadnavis | the entire thackeray group is disaffected because of three or four people among them said devendra fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा