Devendra Fadnavis | राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तुमचाही दाभोळकर होणार अशा आशयाची धमकी पवारांना देण्यात आली आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि सुनील राऊत (Sunil Raut) यांना धमकी दिल्याचे समोर आले. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेणार नाही असा इशारा फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेतले जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाला उच्च परंपरा आहे. राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्यांना धमक्या देणे, समाजमाध्यमांवर व्यक्त होताना मर्यादा ओलांडणे हे खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणात कायद्याप्रमाणे निश्चित कारवाई करतील. या प्रकरणावर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितले.

 

सकाळची पत्रकार परिषद…

गुरुवारी (दि.8) 4 ते 4.15 दरम्यान तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली. (Maharashtra Politics News) महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू, सकाळची पत्रकार परिषद (Press Conference) बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारु, अशी धमकी दिल्याचे सुनील राऊतांनी सांगितलं.

 

सगळी जबाबदारी सरकारवर

Advt.

या धमकीवर त्या अकाउंटवर लोकांच्या आलेल्या कमेंट्स पहा. या सगळ्या कमेंट्स कुठून येतात? हे द्वेषाचं राजकारण आहे. यावर महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) कठोर कारवाई करावी अशी माझी सरकारकडे मागणी आहे. या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर आणि गृहमंत्रालयावर आहे. हे असे प्रकार म्हणजे घाणेरडं राजकारण आहे. असे प्रकार थांबायला पाहिजेत. शरद पवारांची सुरक्षा ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलंय. बघुयात काय होतंय, असंही सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या.

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | threat to political leaders home minister devendra fadnaviss first reaction said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा