Devendra Fadnavis | फडणवीसांनी टाकला ठाकरे सरकारवर ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’, ‘या’ नेत्यांच्या नावाचा उल्लेख (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राची पोलीस (Maharashtra Police) व्यवस्था प्रगल्भ आहे. पोलीस दलाची देशात ख्याती आहे. पोलिसांचा वापर सरकारी पक्षांकडून वाढला आहे. सरकार जर षडयंत्र करत असेल तर लोकशाही संपेल, हा पेन ड्राईव्ह (Pen Drive) मी सुपुर्द करतो. कश्या पद्धतीने सरकार कट करतं याचे व्हिडिओ यामध्ये आहेत, असे म्हणत भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अधिवेशनात बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला आहे. अधिवेशनात बोलत असताना त्यांनी कशा प्रकारे पोलीस यंत्रणेचा (Police System) वापर केला जात आहे, असे सांगत सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Public Prosecutor Praveen Chavan) यांचे काही ऑडिओ रेकॉर्डच (Audio Record) सभागृहात वाचून दाखवले.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत, जे मी दिले आहेत. एफआयआर (FIR), साक्षी पुरावे (Evidence) सगळे, रेड कशी टाकायची, अशी सगळी तयारी त्यांच्या कार्यालयात होते. ही सर्व कथा सरकारी वकिल स्वत: सांगत आहेत. आमच्याकडे असलेल्या एका व्यक्तीने जो आता सरकारमध्ये आहे. हे सर्व तो बोलत आहे. सव्वाशे तासाचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. ते मला जिथे द्यायचे ते देईल, अस म्हणत त्यांनी संभाषण विधानसभेत वाचून दाखवले.

 

 

वकिलांसोबत झालेले संभाषण जसेच्या तसे!
‘गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) एक गुन्हा दाखल झाला की गिरीश महाजन यांनी फोनवर धमकी दिली. या प्रकरणात गिरीश महाजन यांच्यावर मोक्का (MCOCA) Mokka लागावा म्हणून बनावट कागद तयार करण्यात आले’

वकिलांचा संवाद – आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशत पसरविणे असे सांगायचे आहे. ड्रग्जचा व्यवसाय (Drug Business) करतो, हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोक्का लागेल. सट्ट्याच्या पैशातून मोक्का लागत नाही. पण सट्ट्याच्या पैशातून ड्रग्ज म्हटले की मोक्का लागेल. 1 ग्रॅमला लाख रुपये मिळतात, असे सांगायचे.

 

तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का?
ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे. शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण? सुनील गायकवाड (Sunil Gaikwad), महेंद्र बागुल (Mahendra Bagul), सूर्यवंशी (Suryavanshi), रवि शिंदेंने (Ravi Shinde) त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करुन दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यावधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे ‘सारे जबाब मी लिहून दिले होते, त्यांनी हरवून टाकले.

 

सगळा गोंधळात गोंधळ करून टाकला. पवार साहेबांनी (Mr. Pawar) डीजींना (DGP) सांगितले. किती मिटिंगा झाल्या. सीपीला (CP) रात्रभर बसविले. पवार साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला (Yashwantrao Chavan Pratishthan) होतो. मी मागच्या दारातून गेलो. त्यांनी फोन लावले. मी गाडीत बसलो, तर लगेच डीजी चा फोन आला. एसीए, अजितदादा (Ajit Dada), वळसे पाटील (Walse Patil), एसीएस (ACS), डीजी होते. सीपीला रात्रभर बसवून ठेवले. रजत नागपूरला निघून गेला मग सीपीचे फोनवर फोन आले.’

 

सर्व निगेटिव्ह होते. मी कॉपी दिली. शेवटी पवार साहेबांना सांगून अधिकारी बदलविला. अनिल देशमुख (Anil Deshmukh) असते, तर फायदा झाला असता. प्रवीण चव्हाण आला तर त्याला अँटीचेंबरला बसवा, असे पवार साहेबांचे ऑर्डर होते. अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पान हालायचे नाही.

 

अजित पवार (Ajit Pawar) सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार-पाच अधिकाऱ्यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले.

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) यांच्याशी झालेले संभाषण आहे.

 

रेडमध्ये सहभागी होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. कुठल्या मार्गाने जायचे आणि काय काय करायचे,
याची सूक्ष्म व्यवस्था सरकारी वकिलांनी ब्रीफ केली आहे. अगदी सरकारचे रेस्टहाऊस सुद्धा बुक करुन दिले आहे.
वेज/नॉन-व्हेज जेवणापर्यंत सूक्ष्म नियोजन जेवणाची/राहण्याची आणि रुम कुणाच्या नावाने बुक करायच्या,
कॅशमध्ये कसे पैसे द्यायचे, याची संपूर्ण कथा ते सांगत आहेत. यासाठी कोणती मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या,
असेही निर्देश दिले आहेत. खडसे साहेब सर्व पैसे देतील, असेही त्यांनी सांगितले.

 

त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता. एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरु आहे, तोवर तेथे फेकून द्यायचा.
जप्त करायला काय लागते? किती जणांनी माझे नाव या केससाठी रेकमंड केले? दिलीप बोरले, वळसे पाटील, जयंत पाटील (Jayant Patil),
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), अर्जून खोतकर (Arjun Khotkar), अनिल देशमुख, रमेश जाधव (Ramesh Jadhav),
गुलाबराव, हसन मुश्रिफ (Hasan Mushrif), श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांची नावे घेत, त्यांची पत्र मोबाईलवर दाखवितात, या सर्वांनी पवारांना पत्र दिले.

 

गिरीश महाजन अटकत नाही. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डीजीला भेटणार आहे. नाव घेत नव्हते.
साहेबांना फोन करुन मिटिंग लावली. मोक्क्यासाठी ऐकायला तयार नव्हते. 1 दिवसांत एफआयआर ड्राफ्ट करुन दिला.
स्वत: अभ्यास करुन कलम लावली. अनेक कलमे लावली. पण त्यांनी पॅरेच्या पॅरे गहाळ केली.

अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये (Transfer) पैसे कमाविले. 100 कोटींपेक्षाही अधिक. किमान 250 कोटी तरी आहेत.
नुसते बदल्यांमध्ये नाही, तर वाहन खरेदी, बांधकामाचे टेंडर भरपूर मार्ग असतात. 2 वर्षांत 250 कोटी रुपये तरी कमविले असतील.
काय लागते. मुंबईत 100 तरी मोठे बिल्डर्स आहेत. प्रत्येकाने 2/3 कोटी दिले तरी 200-300 कोटी सहज जमा होतात.
बिल्डर्ससाठी 2 कोटी काही मोठी रक्कम नाही. एक नक्की की, अनिल देशमुख आपल्या कामी आला असता.
मी साहेबांचा माणूस. पण माझा फोटो ठेवत नाही. संबंध दाखवित नाही, कधी स्टेटस ठेवत नाही, असा खुलासाच फडणवीस यांनी केला.

 

Web Title :- Devendra Fadnavis | use of police and public prosecutors against bjp devendra fadnavis serious allegations against the maharashtra thackeray government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Important Diagnostic Tests For Women | चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी ‘या’ चाचण्या करायलाच हव्यात, जाणून घ्या

 

Holi 2022 | होळी कोणत्या तारखेला आहे ? होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल केवळ इतक्या मिनिटांचा, चुकवू नका

 

PORD vs SIP | 100 रुपये मंथली गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर कुठे होईल जास्त फायदा, पहा कॅलक्युलेशन