Devendra Fadnavis | आदित्य ठाकरे यांच्यानंतर ‘या’ युवासेना नेत्याची होणार चौकशी, देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) – देवेंद्र फडणवीस सरकारला (Devendra Fadnavis) आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चौकशी करण्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दिशा सालियान प्रकरणात (Disha Salian Case) शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Shiv Sena MLA Aditya Thackeray) यांची एसआयटीने चौकशी (SIT Inquiry) होणार असून, त्यानंतर आता युवासेना नेते वरुण सरदेसाई (Yuva Sena Leader Varun Sardesai) यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे भाजपाचे आमदार योगेश सागर (BJP MLA Yogesh Sagar) यांनी वरुण सरदेसाईंनी मुलांची फसवणूक (Fraud) केल्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेत केली.

 

सरदेसाई यांनी स्काउट्स अँड गाइड (Scout and Guide) या नावाने संस्था स्थापन केली. त्या संस्थेतर्फे युवकांना नोकरी मिळवून देतो म्हणून त्यांना आमिष दिलं. त्याबाबत युवकांनी दहा-दहा लाख रुपये सरदेसाई यांच्याकडे दिले. परंतु या युवकांना फसवले गेले, त्यांना कुठेही कोणती नोकरी मिळाली नाही. हे सर्व युवक विदर्भातील आहेत. शेतकरी कुटुंबातील या युवकांनी आपली शेती विकून हे पैसे सरनाईक यांना दिले आहेत. त्यामुळे वरुण सरदेसाई यांची चौकशी करून त्या युवकांना न्याय द्यावा, अशी मागणी सागर यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली.

 

विदर्भातील या सर्व युवकांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांची भेटही घेतली होती. यानंतर वरुण सरदेसाईंनी या युवकांना धमकी दिली होती की, तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत. याबाबतचे संभाषण असलेला पेनड्राइव्ह योगेश सागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यानंतर झालेल्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar)
यांनी सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासासाठी (Siddhivinayak Ganapati Temple Trust)
कोरोना काळात परराज्यांतून 16,400 लिटर तूप माप मागवण्यात आले होते.
त्यावेळी आपल्या राज्यातील तूपविक्रेत्यांना डावलण्यात आले होते.
कोणत्याही नियमाविना कसल्याही प्रकारची तरतूद नसताना विश्वस्त मंडळांनी
बेकायदेशीर पाच कोटी रुपयांची देणगी दिली होती, असा मुद्दा यावेळी मांडला.

 

याविषयीच्या तक्रारची छाननी लवकरात लवकर एक महिन्याच्या आत करण्यात येईल.
चौकशीनंतर कोणी दोषी असेल तर तात्काळ कारवाई केली जाईल,
असं आश्वासनही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

 

Web Title :- Devendra Fadnavis | varun sardesai cheating case an inquiry will be held devendra fadnavis announced

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | छलकपटाने सत्तेत आलेल्या सरकारचा वचपा निसर्गाने काढला, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

Gopichand Padalkar | ‘आता आरक्षण बस झालं’ शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन पडळकरांचा हल्लाबोल म्हणाले-‘हे आरक्षणाच्या विरोधात, त्यांचा खरा चेहरा…’

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार