Devendra Fadnavis | विधानपरिषद ! सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी मागे का घेतली? फडणवीसांनी सांगितले ‘हे’ कारण (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाकडून (BJP) रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Rayat Kranti Sanghatana President Sadabhau Khot) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी (Independent Candidacy) अर्ज दाखल केला होता. तो त्यांनी अचानक मागे घेतला आहे. याबाबत माहिती देताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, 6 जागा लढवायच्या की 5, यावर आमची चर्चा झाली. पाच जागांवर निवडणूक (Vidhan Parishad Election) लढवावी, असा निष्कर्ष सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी (Chandrakant Patil) काढला. त्यामुळे आम्ही पाचही जागा लढवण्याचे ठरवले आणि सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

 

आम्ही पाचवी जागा जिंकू

विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. ते म्हणाले की, सत्ताधार्‍यांनी विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करावी, अशी आमची अपेक्षा होती. सत्ताधार्‍यांमध्ये अनरेस्ट (असंतोष) आहे. त्याला कुठे तरी जागा मिळावी, म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. 5 व्या जागेचे काही आराखडे आहेत. हे सोपे नाही, पण मला विश्वास आहे, आम्ही 5वी जागा जिंकू.

 

यावेळी फडणवीस म्हणाले, काँग्रेसने (Congress) उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा प्रयत्न झाला. पण काँग्रेसने नकार दिला. महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे. खुल्या मतदानातही जिंकलो, याचा अर्थ त्यांच्यात असंतोष आहे.

 

निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट

दरम्यान, विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे 5, तर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

 

 

हे आहेत विधानपरिषद निवडणूक रिंगणातील उमेदवार

भाजपा

1. प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
2. प्रसाद लाड (Prasad Lad)
3. राम शिंदे (Ram Shinde)
4. श्रीकांत भारतीय (Shrikant Bharatiya)
5. उमा खापरे (Uma Khapare)

 

राष्ट्रवादी

1. एकनाथ खडसे (Eknath Khadse)
2. रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)

 

काँग्रेस

1. भाई जगताप (Bhai Jagtap)
2. चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore)

 

शिवसेना

1. सचिन अहिर (Sachin Ahir)
2. आमश्या पाडवी (Aamshya Padvi)

 

Web Title :- Devendra Fadnavis | vidhan parishad election 2022 devendra fadnavis tells why sadabhau khot withdraws candidature

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा