
Devendra Fadnavis Visit Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या लाडक्या बाप्पांचे दर्शन, केली आरती (Video)
पुणे : Devendra Fadnavis Visit Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट देऊन लाडक्या बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली, यावेळी ट्रस्टचे विश्वस्त उत्सवप्रमुख पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्या समवेत कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (Devendra Fadnavis Visit Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गणेशोत्सवाची सुरूवात पुण्यातून झाली आहे. मी बाप्पांकडे सर्व विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली आहे. फडणवीस यांच्यासोबत माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update