विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले नरसिंहपूरच्या कुलदैवताचे दर्शन

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.8) रोजी कुलदैवत श्री. क्षेत्र निरा नरसिंहपूरला भेट देऊन श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांचे समवेत होते.

मंदिरात पूजेचे पौरोहित्य कमलेश डिंगरे यांनी केले. यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. तर नरसिंहपूर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच कमलताई डिंगरे व उपसरपंच विलास ताटे-देशमुख यांनी फडणवीस यांचा सत्कार केला.

श्री लक्ष्मी नृसिंह हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे कुलदैवत आहे. यावेळी इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. होते. नरसिहपूर येथील दर्शनानंतर देवेंद्र फडणवीस हे इंदापूरला हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले.

महाराष्ट्राच्या भल्यासाठी नेहमी श्री लक्ष्मी नृसिंहचा आशीर्वाद घेतो. श्री क्षेत्र नरसिंहपुरला मी नेहमी दर्शनासाठी येत असतो. दर्शन घेतल्याने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. माझेकडे जी काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या माध्यमातून उत्तम काम करण्यासाठी मी आशीर्वाद घेतला आहे, असे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Visit : Policenama.com

You might also like