Devendra Fadnavis | ‘छत्रपतींचे वंशज हे कधीच हतबल होऊ शकत नाहीत, उदयनराजेंच्या पाठीशी आम्ही कायम आहोत’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सगळीकडून त्यांच्यावर टीका होत आहे. याच दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत स्वतःची भूमिका मांडली होती. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिल्लीत जाऊन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेऊन राज्यपालांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले होते. यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे भोसलेंच्या पाठीशी आम्ही कायम असल्याचे सांगत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य ठिकाणी पोचवल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या पुणे दौऱ्यावर असून ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “भाजप कायम खासदार उयनराजे भोसले यांच्या पाठिशी आहे. छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. तरी त्या ठिकाणी ते भावनेने बोलले असले तरी, महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठिशी आहेत. त्यांच्या भावना योग्य त्या ठिकाणी पोहोचवल्या गेल्यात. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना असतात. मी पुन्हा एकदा सांगतो आमच्या सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठा प्रेरणास्रोत दुसरा कोणी असूच शकत नाही.”

काय म्हणाले उदयनराजे भोसले?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर होतो आहे. त्यांच्यावर कोणीही आक्षेपार्ह बोलत असेल, तर कोणाला राग येत नाही.
महाराजांची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन केली जात आहे. त्यामुळे ती जर का सुधारली नाही,
तर पुढच्या पिढ्यांना महाराज तसेच होते, असे वाटेल.
युगपुरूषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी कायदे केले पाहिजेत.
अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. देशात सध्या सुरु असलेले विकृतीकरण थांबविले पाहिजे.
शिवाजी महाराज यांच्यावर वेडे वाकडे बोलणे सहन झाले नाही पाहिजे.
राजकीय नेत्यांनी अशा लोकांच्या विरोधात कडक भूमिका घेतल्या पाहिजेत.
जर ते शांत बसत असतील, तर त्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही, असे उदयनराजे म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | we are with udayanraje bhosale deputy cm devendra fadnavis commented on governor bhagatsingh koshyari shivaji maharaj comment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chitra Wagh On Sushma Andhare | ‘आमची नावे घेऊन सुषमा अंधारेंचे दुकान चालू आहे’ – चित्रा वाघ

Anshula Kapoor | बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर चर्चेत; ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

Sunny Waghchoure-Golden Boy | बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅनला टक्कर देण्यासाठी पुण्याचा गोल्डन बॉय घेणार एंट्री