Devendra Fadnavis | राज ठाकरेंनी केली निवडणूक न लढण्याची विनंती, देवेंद्र फडणवीस म्हणाले-‘पत्राचा विचार करु पण…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत (Andheri East by-Election) भूमिका घेत मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहीत या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले. दरम्यान राज ठाकरेंच्या या पत्राबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले असून आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करु, असे ते म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

राज ठाकरे यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार (Ashish Shelar) राज ठाकरे यांची भेट घेऊन आले. त्यावेळी अशा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही असं आम्हाला सांगितलं. तसेच, त्यांनी आम्हीही उमेदवार न देण्याची विनंती आशिष शेलार यांच्याकडे केली. त्यांनंतर आता मला पत्र देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, भाजपमध्ये (BJP) मी एकटा निर्णय करु शकत नाही. राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल, तर मला माझ्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांची चर्चा करावी लागेल. आम्ही उमेदवार घोषितही केलाय आणि उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. यापूर्वी आर.आर. पाटील (R.R. Patil) यांच्या वेळेसची निवडणूक असेल किंवा नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका (Legislative Council Election) असतील, जेव्हा-जेव्हा आम्हाला अशाप्रकारे विनंती करण्यात आली, त्यावेळी आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला असताना मला पक्षात चर्चा करावी लागेल, त्यानंतरच योग्य तो निर्णय घेता येईल, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, या स्टेजला आमच्या सोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी देखील चर्चा करावी लागले.
जरुर आम्ही या पत्राचा गांभीर्याने विचार करु, मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चे अंति घेता येईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे?

आमदार कै. रमेश लटके (MLA Ramesh Latke) ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरु झाली.
त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.
माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो.
तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे.
आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं.
असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल.

Web Title :- Devendra Fadnavis | we will consider raj thackeray letter seriously on andheri bypoll elections devendra fadnavis reaction to raj thackeray letter eknath shinde bjp shivsena rutuja latke

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा