Devendra Fadnavis | OBC आरक्षणावरुन फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले; म्हणाले – ‘2 वर्षे कुठं झोपा काढत होते?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) हिवाळी अधिवेशनाला उद्या (बुधवारी) 22 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. यानंतर राज्यातील विविध प्रश्नांवर राज्य सरकारला विधानसभेत जाब विचारणार असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. यावरुन त्यांनी महाविकास आघाडी सरकारला एक इशारा दिला आहे. त्यावेळी फडणवीस यांनी माध्यामांशी सवाद झाला.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘यंदाच्या निवडणुकीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाशिवाय (OBC reservation) हे मतदान होत आहे. न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे सर्वसाधारण जागेतून त्यांना अर्ज करावा लागला आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्यात राज्य सरकार कमी पडले. तसेच, राज्यानेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीचा इम्पॅरिकल डेटा जमा करायचा होता. मात्र, त्यांनी केंद्राकडे बोट दाखवत वेळकाढूपणा केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टात (Supreme Court) झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या
वकिलांनी इम्पॅरिकल डेटा (Imperial data) जमा करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत मागितली होती.
मात्र, न्यायालयाने ती फेटाळली. जर राज्य सरकार आता 3 महिन्यांची मुदत मागत आहे, तर 2 वर्षे काय झोपा काढत होते का?,
असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच, न्यायालयास राज्यातील ओबीसींच्या राजकीय मागासलेपणाचा इम्पॅरिकल डेटा हवा आहे.
जो डेटा राज्य सरकार जमा करू शकते. पण, केंद्राकडे बोट दाखविण्यात येतेय.
ओबीसी समाजाच्या शैक्षणिक आणि नोकरीबाबत आरक्षणासाठी सामाजिक-आर्थिक बाबींचा इम्पॅरिकल डेटा लागतो, जो या राजकीय आरक्षणासाठी लागत नाही.

 

Web Title :- Devendra Fadnavis | were you sleeping 2 years devendra fadnavis angry over obc reservation Thackeray government maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MahaTET Exam Scam | टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण ! तब्बल 500 उमेदवारांचे निकाल बदलले, 5 कोटींचा व्यवहार; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडीओ)

Salman Khan Viral Photo | सलमान खानच्या शर्टलेस फोटोमुळं पुन्हा धडकलं एक्स गर्लफ्रेंडचं Heart, केली फोटोवर कमेंट

Sanjay Raut | संजय राऊतांचं मोदी सरकारला ओपन चँलेज; म्हणाले – ‘तुम्ही हवं तर आम्हा सर्वांना निलंबित करा, पण…’

Pune Crime | पुण्यातील बिल्डरला 50 % व्याजदारे पैसे देणार्‍या बाबा बोडके टोळीतील निलेश जोशीला गुन्हे शाखेकडून अटक; 25 चे मागत होता 50 लाख, कोथरूडमधील 1200 स्क्वेअर फुटच्या फ्लॅटचा ताबा घेण्याची धमकी