Devendra Fadnavis | ‘माझे प्रश्न कोणी बदलले हे…’; पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत फडणवीसांचा खळबळजनक दावा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्यात अनेक विषयांवरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) नोटीस (Notice) पाठवली होती. यावरून भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. याचेच पडसाद विधानसभेमध्ये (Assembly) उमटताना दिसले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुंबई पोलिसांनी प्रश्न विचारण्याबाबत धक्कादायक दावा केला आहे.

 

कोणीतरी जाणीवपूर्वक प्रश्नावली बदलत या व्यक्तिला गुंतवता येतं का ?, आरोपी – सहआरोपी करता येतं का ?, अशा प्रकारचे होते.
मला काहीही फरक पडत नाही. मी एक वकील आहे हे मला समजतं.
मात्र कालचे प्रश्न पाहिले तर असं वाटतं याला काही राजकीय वळण असल्याचा संशय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

 

मी ज्या घरातून येतो ते सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न कुणी आणि कुठे बदलले हे सगळे मला माहीत आहे.
त्याने काहीही फरक पडत नाही. माझ्या वडिलांना इंदिराजींनी (Indira Gandhi) दोन वर्षे जेलमध्ये (Jail) ठेवले होते.
कुठलाही गुन्हा नव्हता. माझ्या काकूलाही १८ महिने तुरुंगात ठेवलं होतं. तुरुंगात जायला घाबरणारे आम्ही लोक नाही, असं फडणवीसांनी सांगितलं. गृहमंत्र्यांनीही (Home Minister) याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

 

दरम्यान, फडणवीस यांना आरोपी म्हणून नाही तर माहिती घेण्यासाठी त्यांना नोटीस (Notice) पाठवली होती.
त्यांना कोणत्याही कटात (Conspiracy) अडकवण्याचा किंवा फसवण्याचा सरकारचा मनसुबा नाही,
असं दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितलं.

 

Web Title :- Devendra Fadnavis | which questions asked by mumbai cyber police in phone tapping case devendra fadnavis revealed in vidhan sabha

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा