Devendra Fadnavis | राज्यात दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवणार, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अकोला शहरामध्ये शनिवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली (Akola Riots) होती. या घटनेत अनेक वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) करण्यात आली तर काही दुचाकी आणि चारचाकी पेटवण्यात आले. या घटनेत दोन्ही गटातील 10 जणांसह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. यावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहे. तर या दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तसेच जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार, असा इशाराही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे. पोलीस अलर्ट मोडवर होते. त्यामुळे कुठेही अनटोल्ड इंसिडेंस (Untold Incidence) होऊ दिला नाही. जेव्हा लक्षात आलं की अशाप्रकारे काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत, सगळीकडे पोलिसांची कुमक त्याठिकाणी पोहोचली आणि आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना अद्दल घडवणार, असा इशारा त्यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हे 100 टक्के जाणूनबुजून होत आहे. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था (Law and Order) बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते सफल होणार नाहीत. अशाप्रकारे जे करत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही, असा दम फडणवीसांनी दिला. काही संस्था, काही लोक मागून याला आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे सगळं बाहेर आणेन, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्षांना
(Assembly Speaker) 16 आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualified) निर्णय लवकर घ्यावा अन्यथा
रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे काही चाललं आहे
ते कोणत्याही लोकशाहीत चालणार आहे. तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा.
तुमची बाजू कमकुवत असल्यानचं अशी वक्तव्य केली जात आहेत. अध्यक्ष कोणतंही बेकायदेशीर काम करणार नाहीत.
ते योग्य निर्णय घेतील. कोणी कीतीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी ते दबावाला बळी पडणार नाही,
असं फडणवीस यांनी म्हटलं.

Advt.

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजप आमदार आशिष शेलार
(BJP MLA Ashish Shelar) यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, यांचं अस्तित्व हे नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi) यांच्यामुळे आहे. यांना खाली कोण ओळखतो अशी टीका केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्या करता ते महत्त्वाचे नसतील,
पण आमच्या करता ते नेते महत्वाचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

Web Title :-  Devendra Fadnavis | why are there constant riots in maharashtra deputy chief minister devendra fadnavis said some institutions are set on fire

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीला पुण्यातून पहिला धक्का, शरद पवारांचा खास शिलेदार भाजपात जाणार

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

Pune Crime News | खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरलेल्या 9 पैकी 2 मुलींचा बुडून मृत्यु; बुलढाणा जिल्ह्यातील मुली