Devendra Fadnavis | पीएफआयवर बंदी घालणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सूचना

आदित्य ठाकरेंचा घेतला समाचार, अजित पवार आणि नाना पटोले यांना टोले

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या Popular Front of India (पीएफआय-PFI) कारवाया आणि पुण्यातील त्या आंदोलनातील पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या
आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा (FIR) दाखल करण्याच्या सूचना पुण्याचे पोलिस आयुक्तांनी (Commissioner of Police) दिली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तसेच, पीएफआय या संघटेवर बंदी घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार (Central Government) याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी दिली.

 

पुण्यात एक कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात (Maharashtra) कुठेही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत. अशा प्रकाराची घोषणा आम्हाला मान्य नाही. मी पोलिस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले आहे की, देशद्रोहाचा गुन्हा अशा लोकांवर दाखल केलाच पाहिजे. पीएफआयचा जो तपास सातत्याने गेली काही वर्षे पुरावे जमा करुन करण्यात आला आहे. वेगवेगळया राज्यांना काम केले आहे. मागच्या काळात मी गृहमंत्री असताना, राज्यात त्यांच्या कारवायांची नोंद घेतली जात होती.

 

तपास केला जात होता. केरळसारख्या सरकाराने देखील पीएफआय या संघटेनेवर बंदी घालावी, अशी मागणी केली असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यावर केंद्र सरकार, राज्य सरकारचे (State Government) लक्ष या तपासापासून कोणी कितीही प्रयत्न केले तरी, विचलित होणार नाही आणि निश्चितपणे जे देशद्रोही कारवाया करतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात दोन वेगवेगळया प्रकाराचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्याची योग्य तपासणी होईल. मात्र, राज्यात जो काणी पाकिस्तानचे नारे लावेल, त्यांना आम्ही सोडणार नसून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा देखील फडणवीस यांनी दिला. आयुक्तां सोबत आमची चर्चा झाली. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा लागेल, असे सांगितल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) एका संदर्भात बोलताना म्हणाले.

नाना पटोले (Nana Patole) दिवसभरात अनेक विनोद करीत असतात ते ऐकायचे आणि त्यांचा आनंद घ्यायचा, असा टोल हाणून त्यांनी त्यांच्या विनोदावर आम्हाला प्रतिक्रीया का विचारता, असा सवाल करुन पटोले बेताल बोलतात, असा घणाघणात करुन अशा बेताल व्यक्तीला उत्तर देण्याइतका माज्याकडे वेळ नाही, असे ते म्हणाले.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) बाबत यांच्या पालकमंत्री (Guardian Minister) संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, मी अजित पवारांना हा गुरुमंत्री देईल, की येत्या काळात कधी त्यांचे राज्य आले, आणि त्यांनाही दोन चार जिल्हे ठेवायचे असल्यास ते कसे मॅनेज करायचे हा गुरुमंत्र त्यांना देईल.
मात्र, जे जिल्हे आहेत तेथे नियोजन मंत्री म्हणून आहेत.
मी तर अख्खा महाराष्ट्र संभाळला आहे. तर, सहा जिल्ह्याचे काय घेवून बसला, असा प्रतिटोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

 

रायगडावर पिंडदानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल प्रकरणी बोलताना फडणवीस म्हणाले
की, याची नक्की माहिती घेतली जाईल. चुकीचे काम होत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल.

आदित्य ठाकरेंचा घेतला समाचार
आदित्य ठाकरें (Aditya Thackeray) यांनी तळेगाव येथून जे वेदांत फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकरणी आंदोलन करुन सरकारा टिका केली,
त्याचा आदित्य यांचे नाव न घेता फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चांगलाचा समाचार घेतला.
कालं परवा कोणीतरी येथे येवून आंदोलन वगैरे केले. त्यांनी ती जागा दिली होती का त्यांना,
असा सवाल करुन ही जागा आमची वेदांत वाल्यांना दाखविल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट करताना,
शेवटच्या महिन्यात आम्ही त्यांना जावू नका, आम्ही सगळं करायला तयार आहोत, असा प्रयत्न केला.
मात्र, आता काही लोकं नाटक, नौटंकी करत आहेत. परंतु, जोपर्यंत राज्यातील वातावरण चागलं करीत नाही.
तोपर्यंत गुंतवणूक राज्यात येणार नाही. हे वातावरण चांगल करण्याचा काम आम्हाच्या काळात आम्ही करु
आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला गुंतवणुक क्षेत्रात सर्वाच्च स्थानी आणू, असे फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | Will ban PFI; Information of Home Minister Devendra Fadnavis; Instructions regarding the filing of a case of sedition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IND vs ENG | भारताच्या दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच घेतली विकेट

CM Eknath Shinde | ते बंड फसले कारण त्यावेळी अजित पवार होते, यावेळी…, एकनाथ शिंदे यांनी सांगितला फरक

Ashish Shelar | भाजपाच्या शेलारांचा शिवसेनेला सवाल, पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?