Devendra Fadnavis | शिवसेनेसोबत पुन्हा मैत्री करणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टंच सांगितलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Devendra Fadnavis | अनेक काळापासूनची शिवसेना आणि भाजप (BJP and Shiv Sena) यांची युती अखेर तुटली आहे. 2014 च्या निवडणुकीत केंद्रात भाजप सरकार आलं. महाराष्ट्रातही भाजपाने भरघोसपणे निवडणुक खेचली. हिंदत्नाच्या मुद्यावर दोन्ही पक्ष एकत्र आले. सत्ता स्थापन झाली आणि पाच वर्ष टिकली. 2019 मध्ये मात्र महाराष्ट्रात राजकारणाचं मोठं समीकरण बदललं आणि युती तुटून राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. सध्या भाजप आणि शिवसेनेत राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळतं. दरम्यान, भाजप शिवसेना पुुन्हा एकत्र येणार का? यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

राज्यात गेल्या दोन वर्षापासून महाविकास आघाडी सरकार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप, शिवसेना युती होण्याची दाट शक्यता होती.
परंतु राजकीय वातावरणात बदल होऊन एक मोठी खळबळ उडाली.
या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेने काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रसचा (NCP) हात पकडल्याने सत्तेत येणा-या भाजप पक्षाला विरोधी बाकावर बसावं लागलं.
या पार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) हे अनैसर्गिक सरकार आहे.
जनतेने भाजपला निवडून दिलं आहे. यांना निवडून दिलेलं नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आम्ही एकत्र आहोत, असं म्हणत त्यांनी मतं मागितली आहेत का?
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मागितली. शिवसेनेने देखील मोदींच्या नावाने मतं मागितली.

 

पुढे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘राजकारणात कुणीही मित्र होऊ शकतो. पण आता शिवसेना आणि आमच्यात जी परिस्थिती आहे ती मित्रत्वाची नाहीय.
आमची वैयक्तिक मैत्री असू शकते. पण पक्ष म्हणून मैत्री नाही. शिवसेना ज्याप्रकारे वागतेय त्याच्या आधारावर मला वाटत नाही की आमची फार मैत्री होऊ शकेल.
कारण हिंदुत्व आमच्यातला धागा होता. ते हिंदुत्वच त्यांनी सोडून दिलं. आता जनाब बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने उर्दू कॅलेंडर काढली जात असतील.
अजान स्पर्धा घेतली जात असेल आणि त्रिपुरात न घडलेल्या घटनेवर अमरावतीत दंगा झाल्यानंतर त्याची रिअ‍ॅक्शन म्हणून जे काही झालं त्यात फक्त हिंदूंवर कारवाई होत असेल तर शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय.

दरम्यान, जनतेला तर मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार हवं होतं. या सरकारला जनतेने मत दिलं नव्हतं. अनैसर्गिक गोष्टी फार काळ टिकत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात जोपर्यंत युती किंवा आघाडी तुटत नाही तोपर्यंत मुदत सांगता येत नाही.
त्यामुळे वाट बघितली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Devendra Fadnavis | will be friend shiv sena again big statement of devendra fadnavis bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 16 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Omicron Variant | ’ओमिक्रॉन’ किती धोकादायक? सध्याची लस प्रभावी ठरेल का? कशी आहेत लक्षणं? WHO नं याबाबत केलं सावध, जाणून घ्या

Anushka Sen | अनुष्का सेनची मालदीवमध्ये मस्ती ! बॅकलेस मोनोकनी आणि स्कूबा डायव्हिंग करत शेअर केले फोटो आणि व्हिडीओ