‘वंचित’ विरोधीपक्ष होईल असं सांगत होते फडणवीस, आता विरोधात बसण्याची वेळ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूक लढली गेली ती भाजप विरुद्ध भाजप अशीच लढली गेली. निवडणूकीदरम्यान शरद पवारांना भाजपकडून टार्गेट करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते देखील भाजपने फोडले. परंतू एकट्या शरद पवारांनी भाजपला निवडणूकीत धूळ चारली. आता फडणवीस यांनाच विरोधात बसण्याची वेळ आली आहे.

फडणवीस यांच्या भाषणाने निवडणूक रंग भरले गेले होते. समोर मल्लच नाही, कोणाशी लढायचं, पवार राजकारणाचा अस्त झालाय. मी पुन्हा येईल, ईडीच्या चौकशीच्या फेऱ्या यामुळे राजकारण चांगलेच रंगले. महाजनादेश यात्रेत आपल्या प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. भाजपच विजयी होणार हा दावा करण्यात आला होता. परंतू येवढे सगळे असताना पवारांनी निवडणूकीत सळो की पळो करुन सोडले.

देवेंद्र फडणवीस यांनी तर दावा केला होता की राज्यात आपल्यासमोर लढण्यास विरोधकच नसून भविष्यत विरोधीपक्ष वंचित असेल. त्यामुळे निवडणूक वंचितचा विश्वास वाढला होता. एवढेच काय तर वंचितने मित्रपक्ष एमआयएमची देखील साथ सोडली. परंतू वार फिरलं ते पवारांच्या एका भाषणाने. निकालानंतर भाजपला मोठा धक्का बसला. 123 वरुन भाजप थेट 104 वर आली. त्यामुळे विरोधात वंचित बसेल असा देवेंद्र फडणवीस यांच्या दावा त्यांच्यावरच पलटल्याचे दिसते आहे. आता फडणवीसांनाच विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे.

Visit :  Policenama.com