‘त्यांचे’ पंणजे-खापरपंजे जरी खाली आले तरी सरकार पडणार नाही, ‘तिथं’ देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती परत येणार नाही, राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गजानं दिली ‘गॅरंटी’

निंबा (अकोला) : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल वारणकार)  : विदर्भातील राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निंबा गावाला भेट दिली यावेळी एका कार्यक्रमात बोलताना आमदार मिटकरी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करताना काही लोकं सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून वाट पाहून आहेत की, सरकार पडणार की काय ? मात्र यांचे पंणजे-खापरपंजे जरी खाली आले तरी सरकार पडणार नाही. त्यामुळे ‘येथे देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती परत येणार नाही याची गॅरंटी मी घेतो.’ अशी जबरी टीका आमदार मिटकरी यांनी केली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला काही लोक हवा देण्याचे काम करत आहेत. सुशांत सिंग राजपूतवर राजकारण करुन भाजपवाले खडा मारण्याचा प्रर्यंत करत आहेत मात्र यांचा खडा लागणार नाही, हीच तळमळ जर या लोकांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यासारख्या महान व्यक्तीच्या प्रकरणावर दाखविली असती तर उलट अभिमान वाटला असता. असे आमदार मिटकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान महाराष्ट्राचं सरकार हे शेतकऱ्यांच्या चोवीस तास पाठिशी आहे. अशा विश्वास सुद्धा आमदार मिटकरी यांनी यावेळी दिला आहे.

निंबा गावातील ग्रामपंचायतीस आमदार मिटकरी यांच्या तर्फे मास्क व सॅनिटायझर ऑटोमेटेटेड मशीनचे वाटप करण्यात आले असून तुमच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून मास्कचे वाटप यावेळी करण्यात आले आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमादरम्यान निंबा गावातील ग्रामस्थांनी वेगवेगळ्या मागण्यांचे निवदेन आमदार मिटकरी यांची कडे दिली आहेत. ग्रामस्थांची निवेदने स्विकारुन आमदार मिटकरी यांनी निवेदनाद्वारे आलेल्या मागण्यावर अंमलबजावणी करण्याचे आस्वासन दिले आहे. दरम्यान निंबा गावकऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले तसेच मनापासून या परिसरात आमचे स्वागत केले त्याबद्दल आमदार मिटकरी यांनी निंबा वासियांचे आभार सुद्धा मानले आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते मनोहर कापसे होते तर, ग्रामपंचायतचे सरपंच मास्कर व सदस्य रामराव देशमुख, सुभाष तायडे, इब्राहिम शाह,पोलिस पाटील प्रमोद देशमुख, माजी आमदार बळीराम शिरस्कार , गोपाल उगले, अंकुश नेमाडे, डॉ निलेश वानखडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरुण घोरड यांनी केले.