…म्हणून मुख्यमंत्री मुंबई आणि नागपूर येथील मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय बनलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी विधानसभा निवडणुन नागपूर आणि मुंबई येथील विधानसभा मतदार संघातून लढणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. मात्र, त्याबाबत अद्याप तरी अधिकृत माहिती कोणाकडून मिळालेली नाही तसेच दोन मतदार संघातून लढण्याचं कारण देखील समोर आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईतील एका मतदार संघाची चाचपणी करण्यात येत आहे. त्यातुनच मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदार संघ हा पर्याय सूचविण्यात आला असल्याची माहिती समजते. मुख्यमंत्र्यांनी अद्याप तरी दोन मतदार संघातून निवडणूक लढविण्याबाबत कुठलेही भाष्य केलेले नाही. मात्र, राजकीय वर्तुळामध्ये मुख्यमंत्री मुंबई आणि नागपूर येथील मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. एवढेच नव्हे तर मुंबईतील भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबत आग्रह देखील धरला असल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे.

अलिकडील काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियेत कमालीची वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा फायदा आणि काही प्रमाणावर मुंबईत शिवसेनेवर अंकुश ठेवण्यासाठी भाजपाकडून अशा प्रकारची खेळी केली जाऊ शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मुख्यमंत्री दोन मतदार संघातून निवडणूक लढवतील का नाही हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Loading...
You might also like