Devendra Fadnavis | भाजपमध्ये कोणते बदल होणार का? HM अमित शहांच्या भेटीनंतर फडणवीसांचे मोठे विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधान परिषदेच्या निवडणुकीच्या (mlc election 2021) निमित्ताने भाजपमध्ये हालचालिंना वेग आला आहे. अशातच राज्यातील भाजपचे (BJP) प्रमुख नेते दिल्ली दौऱ्यावर असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यातील पक्षाच्या संघटनेमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत, अशी माहिती स्वत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

 

 

आज (शुक्रवार) दुपारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत बऱ्याच घडामोडी घडल्यात. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 

अमित शहा आमचे नेते आहेत. त्यामुळे दिल्लीत आल्यावर आम्ही त्यांची भेट घेतच असतो. त्यामुळे कुठलाही संघटनेमध्ये बदल नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. राजकीय चर्चांना (political discussion) उधाण आले आहे. त्याची कल्पना नाही. मी आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी इथं आलो होतो. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी ही बैठक झाली, असं फडणवीस यांनी सांगितले.

 

दरम्यान, नागपूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसलाही चमत्कार होईल अशी आशा वाटते परंतु असं काही घडणार नाही.
याठिकाणी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) मोठ्या फरकाने विजयी होतील असं म्हणत
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना टोला लगावला.

 

Web Title :- Devendra Fadnavis | will there be any change in bjp devendra fadnaviss big statement after amit shahs meeting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा