CM ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांची 100 पत्र, मात्र एकालाही उत्तर नाही !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना 100 पत्र (leatter) लिहिली आहेत. परंतु त्यापैकी एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेले नाही. (no reply) फडणवीस यांनी विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांना सातत्याने पत्र पाठवली. तशी माहिती स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिली आहे. मात्र, स्वत:मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून फडणवीस यांच्या एकाही पत्राची दखल घेतली गेली नसल्याची माहिती मिळत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रांना उत्तर मिळत नसल्याची माहिती आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना अनेक पत्र लिहिली. आपण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवली असल्याची माहिती खुद्द फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. फडणवीस यांनी पाठवलेल्या एकाही पत्राला उत्तर मिळालेलं नाही. पण त्या पत्रातील काही बाबींवर सरकारने विचार केला, त्यातच आपल्याला समाधान असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

राज्यात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचा सल्ला आणि मागणी त्यांनी केली होती. कोरोनाची चाचणी दिवसेंदिवस भीषण होत आहे. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. ही संख्या राज्यात 42 टक्के इतकी आहे. त्यामुळे मुंबईत तातडीनं चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

You might also like