Devendra Fadnavis | फडणवीसांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘नीरज गुंडे यांच्याशी माझे सबंध आहेतच, पण…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  निरज गुंडे (Niraj Gunde) यांचे नाव घेऊन राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. निरज गुंडे यांच्याशी माझे संबंध आहेतच, ते नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण त्याबाबत बोलण्याआधी मलिक यांनी निरज गुंडे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करावी, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

 

नवाब मलिक यांचा आरोप

 

नीरज गुंडे हा व्यक्ती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा दूत आहे. युती सरकारच्या काळात शिवसेना (Shivsena)-भाजपमध्ये (BJP) संबंध बिघडताच गुंडे हे उद्धव ठाकरे यांना भेटायचे.
गुंडे यांना फडणवीसांच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात, निवासस्थानात थेट प्रवेश असायचा.
सर्व अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये ते रोखठोक जायचे. पोलिसांच्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर त्यांचं नियंत्रण होतं.
त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची वसुली होत होती. फडणवीस हे अनेकदा गुंडे यांच्या घरुनच ‘मायाजाल’ चालवायचे असा आरोप मलिक यांनी केला आहे.

 

माझ्या आधीपासून मुख्यमंत्र्यांचे गुंडे सोबत संबंध

 

नीरज गुंडे यांच्या संदर्भात नवाब मलिक यांनी आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे.
नीरज गुंडे यांच्याशी आमचा संबंध आहेच, 100 टक्के आहे. नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
पण मी जेवढ्या वेळा त्यांच्या घरी गेलो, त्यापेक्षा जास्त वेळा उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गेलेत.
मी जेवढ्या वेळा मातोश्रीवर (Matoshri) गेलोय, त्यापेक्षा जास्त वेळा गुंडे मातोश्रीवर गेलेत.
कदाचित माझ्या आधीपासून उद्धव ठाकरे व नीरज गुंडे यांचे संबंध आहेत.
मलिक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवं होतं, असं फडणवीस म्हणाले.

 

मलिकांनी पुरावे द्यावेत

 

मलिक यांच्याकडे नीरज गुंडे यांच्या विरोधात काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, काहीच अडचण नाही.
एखाद्यामध्ये वाझे (Sachin Vaze) पाहण्याची आम्हाला गरज नाही, ती सवय नवाब मलिक यांची आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

 

Web Title : Devendra Fadnavis | yes i know neeraj gunde says bjp leader devendra fadnavis on nawab malik allegations

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | अमृता फडणवीसांवरील टीकेवरून चंद्रकांत पाटलांचे उत्तर, म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का?’

SSY | दिवाळीत आपल्या मुलीला बनवा लखपती, केवळ 1 रुपयाच्या बचतीवर मिळेल 15 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या कसा?

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…’