‘कोरोना’च्या ‘त्या’ चाचण्या चुकीच्या, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर ‘गंभीर’ आरोप

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनावर मात करण्यासाठी राज्यभरात कोरोनाच्या चाचण्यांवर भर दिला जात आहे. परंतु, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अँटीजन चाचण्यांचे रिपोर्ट 65 टक्के चूक ठरत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सरकारने आरटी-पीसीआर चाचण्या करणेच आवश्यक आहे’ अशी मागणी केली आहे.

कोरोनाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्र राज्यात होत आहे. राज्य सरकारकडून जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. परंतु, अँटीजन चाचण्यांमुळे वाद निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात 6 ऑगस्टला एकूण 78,711 चाचण्यांपैकी 50,421 चाचण्या अँटीजन होत्या, म्हणजे 64 % टक्के चाचण्या करण्यात आल्या. तर फक्त 27440 चाचण्या आरटी-पीसीआर चाचण्या होत्या, म्हणजे 34 टक्के करण्यात आल्या होत्या. आणि 850 चाचण्या इतर पद्धतीने करण्यात आल्या’ असा आक्षेप फडणवीस यांनी घेतला. अँटीजन चाचण्यांचे रिपोर्ट हे 65 टक्के चूक ठरतात असे आढळले आहे. त्यामुळे आरटी-पीसीआर चाचण्या करणेच आवश्यक आहे. राज्यात रोज 54000 पेक्षा जास्त आरटी-पीसीआर चाचण्या करण्याची क्षमता असताना त्याचा पूर्ण क्षमतेने वापर केला गेला पाहिजे’ अशी मागणीही फडणवीस यांनी केली.