Devendra Fadnavis | ‘2024 च्या निवडणुकीत आम्ही एकाच इंजिनवर येणार’; युतीच्या चर्चेला ‘फूलस्टॉप’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील महिन्याभरात भाजप-सेना (BJP-Shiv Sena) युतीची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत होती. दिल्लीत झालेल्या भेटीवरून महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र युतीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘2024 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही एकाच इंजिनवरच येणार आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज पुण्यात आले होते. पुणे मेट्रो (Pune Metro) मार्गाची पाहणी दरम्यान, त्यांनी असं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज शनिवारी पुण्यात आले होते. विविध कार्यक्रम उरकून त्यांनी पुणे शिवाजीनगर आणि स्वारगेट भागातील मेट्रोच्या (Pune Metro) भुयारी मार्गिकेची ते पाहणी केली. त्यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर विधान केलं आहे. त्यावेळी ते म्हणाले की, ‘ज्या प्रकारे मेट्रोला एकच इंजिन असते. मेट्रोला डबल इंजिनची आवश्यकता नाही, तसेच आम्ही 2024 च्या निवडणुकीत पण आम्ही सिंगल इंजिनवरच येणार आहोत असा म्हटलं आहे. यावरून त्यांनी युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

देशाला पुढं नेण्यासाठी चांगल्या कंडक्टरची गरज आहे,
असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले होते.
या वक्तव्यावरून फडणवीस म्हणाले की, ‘हा उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव आहे, टिप्पणी का कमेंट आहे,
हे बघावे लागेल. ‘आज उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा वाढदिवस आहे.
त्यांच्या पक्षाने कशा शुभेच्छा द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु, नवीन पिढीला शुभेच्छा दिल्या पाहिजे.
परंपरेने नेतृत्त्व पुढं येत असेल तर त्यांनी अनुभव घेतला पाहिजे’असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना आणि पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केलेली पुणे मेट्रो प्रगती पथावर आहे याचं मोठं समाधान आहे. यात श्रेयवाद नाही.
ही मेट्रो (Pune Metro) पुणेकरांची पुणेकरांसाठी असेल, असं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Web Title :- devendra fadnaviss suggestive reaction to shiv sena bjp alliance at pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे महापालिकेचा जायका प्रकल्प अखेर मार्गी; नदीच्या प्रवाहासह नदीकाठची जैवसाखळी अबाधित राहण्यास होणार मदत

Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले… (व्हिडीओ)

Pune Crime | मौजे म्हाळुगे येथील 18 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या