सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना ‘क्लीनचीट’ मिळाल्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बहुचर्चित सिंचन घोटाळा प्रकरणात अखेर भ्रष्टाचार विरोधी मंडळ (एसीबी) ने राष्ट्रवादीचे नेते व माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचिट दिली आहे. मात्र त्याच्याशी आपल्या सरकारचा संबंध नसल्याचं, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं असून आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 27 नोव्हेंबरला संध्याकाळी एसीबीनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

मागील पाच वर्षात सिंचनाच्या मुद्दावरूनच भाजप नेत्यांकडून सातत्याने अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आले होते. अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर सिंचन घोटाळा प्रकरणाविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली होती. कारण अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर यांच्याविरोधात कथित सिंचन घोटाळ्याच्या सुरू असलेल्या चौकश्या थांबविण्यात आल्या. 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

तसेच त्यांना पाठिंबा देणारे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. 25 नोव्हेंबर रोजी एसीबीने सिंचन घोटाळ्याची चौकशी बंद केली. परंतु, फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार टिकू शकले नाही. अजित पवार यांना त्या तीन दिवसाच्या सरकारच्या काळात की महाविकास आघाडी सत्तेत येत असतानाच क्लिन चीट देण्यात आली असा संभ्रम निर्माण झाला आहे.

यावरून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस म्हणाले की, ‘अजित पवारांच्या क्लीनचिटशी आपल्या सरकारचा संबंध नाही. आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 27 नोव्हेंबरला संध्याकाळी एसीबीनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.’

कायदेशीररित्या सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना दोष देता येणार नाही -एसीबी
मुंबई उच्च न्यायालयात 27 नोव्हेंबर रोजी एसीबीने शपथपत्र दाखल केले होते. यामध्ये एसीबीने स्पष्ट केले की ‘व्हीआयडीसीचे चेअरमन अजित पवार यांना इतर संस्थांच्या भ्रष्टाचारासाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही. कारण, कायदेशीररित्या त्यांचा यात काहीच दोष नाही.’

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like