home page top 1

मुख्यमंत्री साहेब, मी आमदार होतो तेव्हा तुम्ही चड्डीत शाळेत जायचे ; भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना टोला

श्रीगोंदा : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्रजी मी आमदार, महापौर ज्यावेळेस होतो न त्यावेळेस तुम्ही हाफ चड्डीत शाळेत जात होतात. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. ते श्रीगोंदा येथील जाहीर सभेत बोलत होते.

निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, श्रीगोंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, भाजपने पहिल्या गांधींना आधी संपविले आणि त्यानंतर नगरमधील गांधींनाही याच भाजपने राजकारणातून संपविले. भाजपमधील टोळीने आमची पोरं पळवली आणि त्यांना उमेदवारी दिली. ज्यांना पाच वर्षात स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाही ते विकास काय करणार? असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, बिगर निमंत्रणाचे पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाणाऱ्यांनी कशाला देशप्रेमाच्या गप्पा माराव्याता. पुलवामा प्रकरणात जवान शहीद झाले हे मोदी सरकारचे पाप आहे. अभिनंदनला सोडण्यावर मोदी ५६ इंची छाती फुगवतात मग, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून का सोडून आणले नाही. असा सवालही त्यांनी केला.

याचबरोबर बोलतांना, खरे तर माझी काही चूक नसताना मला तुरुंगात टाकले. आणि आता मुख्यमंत्री मला धमकी देत आहेत. आहो देवेंद्रजी ज्यावेळेस आमदार, महापौर होतो ना त्यावेळेस तुम्ही हाफ चड्डीत शाळेत जात होतात आणि आता तुम्हाला विचारून भाषण करू का ? असे भुजबळ म्हणाले.

Loading...
You might also like