Devisingh Shekhawat Passed Away | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devisingh Shekhawat Passed Away | भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Former President of India Pratibhatai Patil) यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे शुक्रवारी (दि.24) पुण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत  मालवली. देवीसिंह शेखावत यांच्यावर संध्याकाळी पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

माजी आमदार देविसिंह शेखावत यांचं आज सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी निधन (Devisingh Shekhawat Passed Away) झालं. देवीसिंह शेखावत यांच्या मागे पत्नी प्रतिभा पाटील आणि एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. देविसिंह शेखावत यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहेत.

देवीसिंह शेखावत यांचा अल्पपरिचय

देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे प्रथम महापौर आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती होते.
1965 रोजी शेखावत आणि प्रतिभाताई यांचा विवाह झाला. विद्याभारती शिक्षण संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
काँग्रेस पक्षाचे सक्रीय सदस्य असलेले शेखावत हे 1985 मध्ये अमरावती मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 1991 मध्ये प्रथम महापौर बनले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मागील अनेक वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास होते.

Web Title :- Devisingh Shekhawat Passed Away | former president pratibhatai patils husband devisingh shekhawat passed away in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Solapur Crime News | पतीच्या मृत्यूनंतर मुलाला मोठ्या कष्टाने शिकवून इंजिनिअर बनवल्यानंतर मुलाचा अपघाती मृत्यू; महिलेचा आक्रोश

Pune Crime News | कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करुन देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुबाडले सव्वा लाख रुपये

Nagpur Crime News | प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून फेसबुक पोस्ट करुन प्रियकराने संपविले जीवन