Devoleena Bhattacharjee | देवोलिना भट्टाचार्जी लग्नाआधीच गरोदर? अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन : स्टार प्लस वरील बहुचर्चित मालिका ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ही घराघरात पोहोचली होती. देवोलीना ने नुकताच बॉयफ्रेंड शाहनवाजशी लग्नगाठ बांधली आहे. देवोलीनाने तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. शाहनवाज हा मुस्लिम असल्याने आता देवोलीनाला (Devoleena Bhattacharjee) ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
नुकताच देवोलीनाचा विवाह पार पडला. देवोलीनाने शाही विवाह सोहळा न करता कोर्ट मॅरेज केल्यामुळे अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यातच देवोलीनाने आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे तिची तुलना श्रद्धा वालकर प्रकरण व आफताबशी केली जात आहे. तर काहींनी शाहनवाज ने लग्नासाठी पैसे खर्च न केल्यामुळे कोर्ट मॅरेज केले असल्याचे बोलले जात आहे. तर आता काहींनी लग्नाआधीच देवोलीना गरोदर असल्यामुळे घाईघाईत लग्न केल्याचेही चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे.
आता देवोलीनाने (Devoleena Bhattacharjee) एका मुलाखतीत या सगळ्या प्रश्नांवर भाष्य केले आहे.
यावेळी बोलताना देवोलीना म्हणाली, “मला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाही.
लोकांची विचारसरणी इतक्या खालच्या पातळीची आहे हे ह्याच्यावरून कळतं.
ज्यांना ज्यांना असं वाटतं की मी लग्नाआधीच गरोदर होते म्हणूनच मी गुपचूप लग्न उरकले त्यांची
विचारसरणी पाहून मला वाईट वाटतं आहे”. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.
तर देवोलीनाचा पती शाहनवाज हा एक फिटनेस ट्रेनर आहे.
Web Title :- Devoleena Bhattacharjee | devoleena bhattacharjee slams trollers on her pregnancy rumours before marriage
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jaykumar Gore Accident | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात
Mumbai Minor Girl Gang Rape Case | मुंबई हादरली! लोअर परळमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहीक बलात्कार