आज घर बसल्या होईल रामलल्लाचं दर्शन ! Facbook, WhatsApp आणि Instagram वर पाहू शकता Live आरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामलल्लाच्या भक्तांसाठी आता घरबसल्या रामलल्ला यांचे दर्शन देणार असल्याचे सांगितले आहे. तात्पुरते राम मंदिरात विराजमान असल्याने कोरोनामुळे रामभक्त त्यांच्या आराध्यदैवतेचे दर्शन करू शकत नाहीत. आता ट्रस्ट सोशल मीडियाद्वारे दरवेळेची आरती आणि पूजेचे थेट दर्शन करणार आहे.

मंदिर बांधण्यास हिरवा कंदील देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशात रामभक्तांना अयोध्येत होणाऱ्या रामजन्मोत्सवात सहभागी होण्याबद्दल उत्सुकता होती, पण लॉकडाऊनमुळे सगळ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. यावेळी बरेच रामभक्त रामलल्ला यांच्या जन्मोत्सवात सहभागी होऊ शकणार नाहीत.

अयोध्येत श्रीराम यांचे दर्शनही बंद आहे. यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामभक्तांना रामलल्ला यांचे दर्शन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यावर निर्णय दिला. या निर्णयानंतर आजपासून रामभक्त घरबसल्या मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्पुटरवर रामलल्ला यांचे दर्शन करू शकतात.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आजपासून फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर रामलल्ला यांच्या शृंगार दर्शनाचे प्रसारण करणार असल्याचा निर्णय केला आहे. रोज सकाळी रामलल्ला यांच्या शृंगाराचा फोटो आणि व्हिडिओ अपलोड केला जाईल. हे प्रसारण रामनवमी आणि त्यानंतरही चालणार आहे.

रामलल्ला यांना २५ मार्च चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवीन तात्पुरत्या इमारतीत बसवण्यात आले असून २ एप्रिलला रामनवमी आहे आणि श्रीराम यांचा जन्मोत्सव आहे. साधारणत: या दिवशी लाखो लोकं अयोध्येत गर्दी करतात, परंतु यावेळी लॉकडाऊन असल्याने गर्दी होणार नाही.

You might also like