थेऊरची पारंपारिक द्वार यात्रा रद्द झाल्याने भक्ताचा हिरमोड

थेऊर : पोलीसनामा ऑनलाईन – अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथे द्वारयात्रेची अखंडीत परंपरा महासाधू मोरया गोसावी यांचे वंशज पिरंगुटकर देव मंडळी दरवर्षी मोठ्या भक्तीपूर्वक करत आहेत परंतु यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही द्वार यात्रा रद्द करण्यात आल्याने अनेक भाविकांचा हिरमोड झाला आहे.

महासाधू मोरया गोसावी यांनी आपल्या गाथ्यात द्वारयात्रेचे महत्व विशद केले आहे. ही द्वार यात्रा मोरगांव तसेच थेऊर येथे भाद्रपद महिन्याच्या प्रतिपदेस चालू होऊन गणेश चतुर्थीस सांगता होते.पिरंगुटकर देव मंडळी दरवर्षी यासाठी मोठी तयारी करुन हा उत्सव साजरा करतात परंतु कोरोनाच्या महामारीमुळे या द्वारयात्रेत भाविकांना यावर्षी सहभागी होता आले नाही.

आज केवळ औपचारिकता पूर्ण केली. गणेशोत्सवाच्या काळात येथे श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात परंतु या काळात मंदिर बंद असल्याने भाविक यापासून वंचित राहणार आहेत.