दगडूशेठ हलवाई गणपतीला 175 किलोचा लाडू ‘अर्पण’ !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या राज्यभरात गणपती उत्सवाचा जल्लोष असून राज्यभरात भाविक मोठ्या भक्तिभावाने गणपतीचे पूजन करत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपतीला नैवैद्याच्या रूपात मोदक देखील दिले जात आहेत. अनेक भाविक 100 किलो ते 200 किलोपर्यंत मोदकाच्या रूपातील प्रसाद बाप्पाच्या चरणी वाहत असतो. अनेक जण सोन्याचे भांडी तसेच दागिने देवाच्या चरणी अर्पण करत असतात.

अशाच प्रकारे पुण्यातील एका भक्ताने दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी 175 किलोचा लाडूचा प्रसाद अर्पण केला. हा लाडू दोन दिवसांत तयार केला असून यासाठी सहा व्यक्तींनी मेहनत केली आहे. पुण्यातील निखिल मालानी यांच्या दीपक केटरर्स यांनी हा 175 किलोचा लाडू तयार केला असून तो काल बापाच्या चरणी अर्पण करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी हा लाडू पाहण्यासाठी गर्दी केली होती. याआधी देखील अनेक व्यक्तींनी गणपतीच्या चरणी अशाप्रकारे मोदकाच्या रूपात तसेच लाडूच्या रूपात प्रसाद अर्पण केला होता.

दरम्यान, याआधी देखील मावळमधील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी दगडूशेठच्या चरणी 151 किलोचा मोदक अर्पण केला होता. या मोदकाला देखील बनवायला आठ तास लागले होते. त्याचबरोबर सलग 15 कामगार हा लाडू बनवण्यासाठी काम करत होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like